नाशिक : नाशिकमधील येवला (Yeola) तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपनीत काम असलेले कामगार 20 फुटांची शिडी घेऊन चालले असताना विजेच्या तारांना (Electrick Shock) स्पर्श झाल्याने दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील येवला-कोपरगाव मार्गावरील नांदेसर शिवारात असलेल्या एका खासगी कंपनीत हा प्रकार घडला.


या ठिकाणी काम करणारे प्रवीण नानासाहेब मोहन व आप्पासाहेब नामदेव गायकवाड हे दोघे कंपनीत (Company Workers) 20 फुटांची शिडी घेऊन चालले असताना विजेच्या तारांना शिडीचा (Ladder) धक्का लागला. शिडीत विजेचा प्रवाह उतरल्याने प्रवीण मोहन व आप्पासाहेब गायकवाड या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर तत्काळ आजूबाजूच्या कामगारांनी वाहचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू (Death) झाला होता. यावेळी मृतांच्या नातेवाइकांनी व नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मनमाड-नगर राष्ट्रीय महामार्गालगत नांदेसर शिवारात रसायन उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या आवारातुन विजतारा गेल्या आहेत. सकाळी 11 वाजेच्या सुमारास प्रवीण आणि आप्पासाहेब हे अॅल्युमिनियमची शिडी घेऊन चालले होते. या शिडीचा वरून गेलेल्या 11 केव्हीए वीजतारांना स्पर्श झाला. यामुळे दोन्ही कामगारांना जबरदस्त शॉक (Shock) बसला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. येवला शहर पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेतील मृत प्रवीण मोहन याची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड होणार होती. त्यासाठी तो बुधवारी मुंबई येथे जाणार होता, अशी चर्चा घटनास्थळी मोठ्या संख्येने जमलेल्या नातेवाइकांत होती. प्रवीण यांच्या पश्चात आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक स्थिती बेताचीच असल्याचे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले.


मनमाडला विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू


दरम्यान मनमाड शहरात विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शहरातील शकुंतलनगर भागात पाणी भरण्यासाठी लावलेल्या वीज  मोटरचा शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला. दुपारी नळाला वीज मोटर जोडल्यानंतर मोटरला घाईगडबडीत पाण्याचा ओला हात लागल्याने विजेचा धक्का लागला. यात जयश्री भीमानंद महिरे या महिलेचा मृत्यू झाला. पावसाअभावी पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Aurangabad : घरात हीटर लावत असताना घडलं भयंकर, महिलेचा जागीच मृत्यू; औरंगाबादच्या सिल्लोडमधील घटना