नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहोचला असून उद्या (27 सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप द्यावा लागणार आहे. यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले असून नाशिक शहरातील सहा विभागात नैसर्गिक घाटांसह कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 56 कृत्रिम तलाव तर 27 नैसर्गिक घाट (Ganesh Visarjan 2023) विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.


गेल्या नऊ दिवसांपासून नाशिककर मोठ्या भक्ती भावाने गणपतीच्या (Ganesh Chaturthi) आराधना करत आहेत. उद्या बाप्पाला मनोभावे निरोप दिला जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनासह नाशिक मनपा (Nashik NMC) सज्ज झाली असून महापालिकेने पर्यावरण पूरक गणेशोत्सवांतर्गत मूर्ती विसर्जनासाठी (Nashik Ganesh Visarjan) 27 नैसर्गिक आणि 56 कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पालिकेच्या मिशन विघ्नहर्ता अंतर्गत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी तसेच प्रदूषण टाळण्यासाठी यात्रे 83 ठिकाणी पीओपीच्या गणेश मूर्ती संकलनाची सुविधा देण्यात आली आहे. 


नैसर्गिक तलाव कुठे कुठे आहेत?


नाशिक शहरातील (Nashik City) सहाही भागात नैसर्गिक कला उभारण्यात आले आहेत. यात पूर्व भागात लक्ष्मीनारायण घाट रामदास स्वामी मठ मनपा एसटीपी परिसर आगळ टाकळी तर सातपूर भागातील गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशी पुल, मते नर्सरी पूल या ठिकाणी नैसर्गिक विसर्जन करता येणार आहे तर पंचवटी परिसरात राजमाता मंगल कार्यालय, मसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा इत्यादी ठिकाणी तर पश्चिम भागात यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथला पटांगण, सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट आदी ठिकाणी तर सिडको भागात पिंपळगाव खांब, वालदेवी घाट, तर नाशिकरोड परिसरातील चेहडी गाव नदी किनारा, पंचक गोदावरी नदी, स्वामी जनार्दन पुलालगत, दशक गाव नदी, वालदेवी नदी,देवळाली गाव, विहित गाव ही नैसर्गिक स्थळे आहेत. या परिसरात नैसर्गिकरीत्या विसर्जन करता येणार आहे.


कृत्रिम तलाव कुठे कुठे आहेत?


नाशिक शहरातील 56 ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. यामध्ये पूर्व भागात लक्ष्मीनारायण घाट रामदास स्वामी मठाजवळ, रामदास स्वामी नगर लेन एक बस स्टॉप जवळ, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली, डीजेपी नगर गणपती मंदिराजवळ, शारदा शाळेसमोर राणेनगर, कलानगर चौक, राजसारथी सोसायटी, तर सातपूर भागात शिवाजीनगर सूर्या मर्फी चौक, अशोक नगर पोलीस चौकी, नंदिनी नदी नासर्डी पूल, अंबड लिंक रोड, आयआयटी पूल, सातपूर पाईपलाईन रोड, जॉगिंग ट्रॅक समोर तर पंचवटी भागात राजमाता मंगल कार्यालय, गोरक्ष नगर, आरटीओ कॉर्नर, नांदूर मानूर, कोणार्क नगर, तपोवन, प्रमोद महाजन गार्डन, रामवाडी जॉगिंग ट्रॅक शेजारी तर पश्चिम भागात चोपडा लॉन्स पूल मागे, गोदापार्क, चव्हाण कॉलनी, परीची बाग, पंपिंग स्टेशन जवळ फॉरेस्ट नर्सरी, पुलाजवळ बॅडमिंटन हॉल, येवलेकर मळा, दोंदे पूल, उंटवाडी म्हसोबा मंदिराजवळ, महात्मा नगर जल कुंभाजवळ, पंडित कॉलनी पालिका कार्यालयासमोर, शितळादेवी मंदिरासमोर सिडको भागात गोविंद नगर, जिजाऊ वाचनालय, राजे छत्रपती व्यायाम शाळेजवळ जुने सिडको, पवन नगर जलकुंभ, राजे संभाजी स्टेडियम, मीनाताई ठाकरे शाळा, तर नाशिक रोड परिसरात मनपा शाळा क्रमांक 125 मुक्ती धाम, शिखरेवाडी मैदान, मनपा नर्सरी, जय भवानी रोड पालिका क्रीडांगण, चेहेडी पंपिंग नारायण बापू नगर चौक, राजेश्वरी चौक, गाडेकर मळा, केला विद्यालय आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत.



इतर महत्वाची बातमी : 


Ganesh Chaturthi 2023 : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचे विसर्जन, जाणून घ्या पूजा पद्धत