नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात (Nashik) लाचखोरीने कळस गाठला असून दिवसाआड एसीबीच्या (ACB) पथकाकडून अधिकारी, कर्मचारी यांना अटक केली जात आहे. असं असताना देखील लाच घेताना कोणीही कचरताना दिसत नाही. अशातच केटरिंग व्यावसायिकाला पाण्याच्या नमुन्यांचा अहवाल चांगला आहे, असा निर्वाळा देण्यासाठी सरकारी प्रयोगशाळेतील एका वरिष्ठ अनुजीव सहाय्यकाने दोन हजारांची लाच मागितली. लाचेची रक्कम स्वीकारताना जिल्हा रुग्णालयाच्या (Nashik Civil Hospital) आवारात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. 


नाशिक जिल्ह्यात लाच लुचपत (ACB) प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून सातत्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. महसूल आरोग्य, शिक्षण त्याचबरोबर पोलीस प्रशासन (Nashik Police) देखील लाचखोरीच्या (Bribe) आघाडीवर असल्याचे चित्र आहे. शासनाकडून जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या अनेक विभागांमध्ये लाचखोरी सुरु असल्याचे अशा कारवायांमधून अधोरेखित झाले आहेत. दरम्यान आरोग्य विभागाच्या जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत तक्रारदार केटरिंग व्यावसायिकाने पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी काही नमुने दिले होते. तक्रारदार हे त्यांच्या भावाच्या नावाने नोंदणी केलेली फर्म तसेच अन्य तीन फर्मद्वारे केटरिंगचा व्यवसाय करतात. सर्व चारही केटरिंग फर्मच्या (Catering Firm) व्यवसायाकरिता जे पाणी वापरतात त्या पाण्याचे एकूण चार नमुने तपासणीसाठी त्यांनी प्रयोगशाळेत आणून दिले होते. 


दरम्यान, चारही केटरिंग फर्मच्या व्यवसायाकरता जे पाणी (Water) वापरतात. त्या नमुन्यांच्या तपासणीअंती अहवाल प्रयोगशाळेकडून दिला जाणार होता. वरिष्ठ अणुजीव सहाय्यक संशयित वैभव दिगंबर सादिगले यांनी तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली. पाण्याचे नमुने चांगले आहेत, असा अहवाल हवा असल्यास दोन हजारांची लाच मागण्यात आल्याने तक्रारादाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. तिथे घडलेला प्रकार सांगितला. पथकाने खात्री पटवून सापळा रचला. यावेळी संशयित वैभव याने पंचांसमक्ष प्रतीनमुनाप्रमाणे पाचशे असे दोन हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय आहे नेमकं प्रकरण? 


तक्रारदार हे त्यांचे भावाच्या नावाने नोंदणी केलेली संस्था तसेच इतर तीन संस्थाचा केटरिंग व्यवसाय करतात. अशा नमुद चार ही केटरिंग व्यवसायाकरीता जे पाणी वापरतात. त्या पाण्याचे एकूण चार नमुने तपासणी होऊन त्याबाबत अनुकूल अहवाल देण्यासाठी आलो. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेतील वरिष्ठ अणुजीव सहाय्यक वैभव दिगंबर सादिगले नाशिक तकारदार यांच्याकडे शासकीय की व्यतिरिक्त प्रत्येक पाणी नमुन्याचे पाचशे प्रमाणे चार नमुन्यांचे एकूण 2 हजार रूपये लाचेची मागणी केली. मात्र तक्रारदार यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दिली. सदर तकारीवरून नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान संशयित वैभव दिगंबर सादिगले यास लाचेची रक्कम स्विकारताना पकडण्यात आले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Nashik Crime : जनतेचे सेवक ना? मग लाच घेताना लाज कशी वाटत नाही, हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर?