नाशिक : नाशिकमधून (Nashik) धक्कादायक घटना समोर आली असून डिलेव्हरी (Delivery) झाल्या झाल्या उपस्थित डॉक्टरच्या हातून नवजात बाळ खाली पडल्याने बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मेडिकल कॉलेज आणि महाविद्यालयात (MVP Medical Collage) प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालक दगावल्याचा गंभीर आरोप संबंधित कुटुंबियांकडून करण्यात आला. कुटुंबीयांनी केलेले सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळून लावले आहेत. मात्र या घटनेने सर्वसामान्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिकच्या (Nashik) आडगाव परिसरातील नामांकित मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालयात हा प्रकार घडला. 2 ऑक्टोबर रोजी सुट्टीच्या दिवशी सकाळी जेलरोड परिसरात राहणाऱ्या फाल्गुनी जाधव या महिलेला प्रसूतीसाठी मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालयात नातेवाईकांनी दाखल केले होते. सायंकाळी महिलेची प्रसूती तर झाली, मात्र बाळ वाचू शकले नाही. दरम्यान प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे (Doctor carelessness) बाळ खाली पडून जखमी झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. तसेच शस्त्रक्रियेनंतर दोन तास आम्हाला काहीही माहिती देण्यात आली, उपचाराबाबत कुठले कागदपत्रही दाखवण्यात आल्याचा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला असून पुन्हा कोणासोबत असा प्रकार होऊ नये, म्हणून मराठा विद्याप्रसारक समाज रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासन आणि दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बाळाची आई म्हणाली की....
तर याबाबत मृत बाळाची आई म्हणाली की, माझी नॉर्मल डिलिव्हरी असल्याने भूल दिली नव्हती. बाळ बाहेर निघाले, पण समोरच्या डॉक्टरला ते पकडता न आल्याने खाली पडले. त्यातच दुसरीकडे संबंधित रुग्णालय प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून बाळाचा जन्म होताच दगावले होते. आमची चूक नाही असं म्हंटलय. आडगाव पोलिसांनी (Adgaon police) याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करत व्हिसेरा राखून ठेवला असून चौकशी सुरू केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसा तपास करतायत याकडेच सगळ्यांचंच लक्ष लागल. मात्र या घटनेने एका कुटुंबातील नवजात बालकाला जीवाला मुकावं लागलं असून नऊ महिने जीवापाड जपत, कळा सोसत त्या माऊलीच्या समोरच अशी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नांदेडमध्ये दोन दिवसांत 35 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 36 शिशू अत्यवस्थ आहेत.
इतर महत्वाची बातमी :
Nashik Infant Death : प्रसुतीवेळी बाळाचा खाली पडून मृत्यू? कुटुंबीयांकडून डॉक्टरांवर गंभीर आरोप!