Nashik Latest Crime News Update: नाशिक शहरातून अपहरणाच्या घटना समोर येत असताना सिन्नर शहरातून महत्वाची माहिती समोर येत आहे. येथील उद्योजक असलेल्या सुरेश कलंत्री यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.
सिन्नर शहरातील वावी वेस परिसरातून आज सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास 12 वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. चिराग तुषार कलंत्री असे अपहरण झालेल्या बालकाचे नाव आहे. चिराग आपल्या मित्रांसोबत सायंकाळी हा घरासमोरील काळे वाड्या समोरील मोकळ्या जागेवर खेळत होता. यावेळी घराजवळून सफेद रंगाच्या ओमिनी कार मधून आलेल्या काही संशयितांनी चिरागला ओढून गाडीत टाकत पळ काढला. त्याच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा केला. तसेच परिसरातील नागरीकांनी ओमिनी वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काही जणांनी वाहनावर दगडफेक करत गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, ओमिनी सुसाट वेगाने सिन्नर नगर परिषदेसमोरून फरार झाली.
दरम्यान त्यातील दोन संशयित इसमानी काळ्या रंगाची पॅन्ट व डोक्यात गुलाबी रंगाची टोपी व तोंडाला काळ्या रंगाचे मास्क घातले असल्याचे प्रत्यशदर्शीच्या बोलण्यावरून समजले. अपहरणाच्या काही वेळानंतर चिरागच्या आईला एका नंबरवरून फोन आला असता त्यांनी पैसे तयार ठेवण्याचे सांगितले. पुन्हा फोन करतो असे सांगून ठेऊन दिल्याचे समजत आहे. त्यामुळे आता पुढे काय असा प्रश्न कलंत्री परिवारासमोर उभा राहिला आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी बिपीन बाफना खून प्रकरणातील संशयितांना न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यांनी देखील प्रसिद्ध व्यावसायिक बाफना यांच्या मुलाचे अपहरण करून खंडणी मागितली होती. शिवाय त्याचा खून केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता सिन्नर शहर परिसरातून मुलाचे अपहरण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा:
Nashik News : हॅप्पी बड्डे भावा! पण बॅनरबाजी इथं नाही करायची... नाशिक मनपाने दिला दणका