नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात हिट अँड रनच्या (Hit & Run) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आता नाशिकमध्ये (Nashik Accident News) हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मद्यधुंद समाज कल्याण विभागाच्या अधीक्षकाने (Social Welfare Department Superintendent) दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) वाहनचालकाला अटक केली आहे.
नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) हद्दीत हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद वाहनचालकाने दोन चारचाकी आणि दुचाकीला उडवले आहे. विशेष म्हणजे मध्यधुंद गाडी चालविणारा समाज कल्याण विभागाचा अधीक्षक आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधीक्षक विजय चव्हाण (Vijay Chavan) याला अटक करण्यात आली असून त्याला कोर्टात (Court) हजर केले जाणार आहे. ज्यांनी नागरिकांना शिस्त लावणे अपेक्षित आहेत ते सरकारी अधिकारीच बेदरकारपणे मद्यधुंद वाहन चालवित असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
मद्यधुंद कारचालकाला अटक
या घटनेची माहिती देताना पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख (Shrinivas Deshmukh) म्हणाले की, 23 ऑगस्ट 2024 रोजी रात्री साडेदहा वाजेच्या दरम्यान समाज कल्याण विभागाचे अधीक्षक विजय चव्हाण (56) हे त्यांची कार दारूच्या नशेत चालवत होते. पौर्णिमा बसस्टॉप परिसरातील गणपती स्टॉलजवळ उभा असलेल्या गाड्यांवर त्यांनी धडक दिली. यात तीन गाड्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे विजय चव्हाण याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाहीत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या