नाशिक :  यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि डीजेच्या दणदणाटात धुमधडाक्यात होणार आहे. तर नाशिकमध्ये देखील गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. याबाबत नाशिक गणेश मंडळाची बैठक पार पडली.  कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाही. त्यामुळे गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात होणार आहे. 

 

दरम्यान नाशिक गणेश मंडळाची याबाबी बैठक पार पडली असून यंदाच्या गणेशोत्सवाचे नियोजन करण्यात आले. गणेशोत्सव साजरा जल्लोषात करण्यासाठी परवानगीच्या नावाखाली पालिकेसह पोलिसांनी मंडळाची अडवणूक केली जावू नये, अशी एकमुखी मागणी गणेशोत्सव महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली.
  

 

नाशिककरांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून शहरातील मुख्य ठिकाणी गणेश मूर्ती केंद्रही थाटले आहेत. तर ढोल पथकांची जय्यत तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गणेश मंडळाच्या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकांचे नियोजन करण्यात आले. त्यादृष्टीने प्रत्येक गणेश मंडळाने तयारी सुरू केली आहे. मात्र, पालिका, पोलीस , वाहतूक, महावितरण अशा विविध परवानगीसाठी पदाधिकाऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात ते यंदा सहन करणार नाही, असा इशारा यावेळी मंडळाच्या बैठकीत देण्यात आला. 

 

तसेच गणरायाच्या आगमनाच्या आठ दिवसांपूर्वी शहरातील खड्डे बुजविले गेले पाहिजे. अन्यथा पालिका आयुक्तसह अधिकाऱ्यांना जाब विचारण्याच्या निर्णय घेण्यात आला.  बैठकीत मंडळाकडून करण्यात आली. महापालिका तसेच पोलीस प्रशासनाने 15 दिवसापूर्वीच्या परवानगी सह डीजे, मिरवणूक आदीला परवानगी द्यावी अशा विविध मागण्या याप्रसंगी करण्यात आल्या.

 

संबंधित बातम्या :