Nashik Fire : नाशिक (Nashik) शहरातील द्वारका परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग (Fire) लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर आगीची घटना समजल्यानंतर बघ्यांची गर्दी झाली आहे. 


नाशिकच्या द्वारका (Dwarka) हा गजबजलेला परिसर असून आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झोपटपट्टी परिसरात भीषण आग लागली आहे. दाटीवाटीचा परिसर असल्याने आग पसरत गेली असून या घटनेत दोन गॅस सिलिंडरचा स्फोट (Gas Cylinder) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आग वाढत गेली आहे. मात्र स्थानिकांनी तात्काळ घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यामुळे अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. 


प्राथमिक माहितीनुसार नाशिक शहरातील द्वारका भागातील झोपडपट्टी आहे. या ठिकाणी आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही आग लागल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस  प्रशासन आणि अग्निशमन दल या ठिकाणी उपस्थित झाले होते. दरम्यान आगीची घटना भीषण असून बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. सध्या पाच अग्निशमन बंबाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु असून स्थानिक लोकही यामध्ये मदत करत आहेत. तर अद्याप किती लोक अडकून आहेत? याबाबत ठोस माहिती मिळू शकली नाही. तसेच आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


हे देखील वाचा-


Nashik News : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाचे 1869चे प्रवेशद्वार झाले 'स्मार्ट', तब्बल 70 लाखांचा खर्च 


Nashik News : आवडत्या श्वानाचं निधन झालं, सगळा गाव हळहळला! गावात बांधणार स्मारक


Nashik News : नाशिकचे गर्ल्स आयटीआय राज्यात पहिले, अव्वल येण्यासाठी 'हे' आहेत निकष