Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून 13 जण गंभीर जखमी आहेत. नाशिक शहरात झालेल्या अपघातानंतर रस्त्यांवर फिरणाऱ्या मालवाहतूक वाहनांचे नियम काटेकोरपणे का पाळले जात नाही? नियम पाळले जात नसूनही पोलीस किंवा आरटीओ त्यांच्यावर कारवाई का करत नाही? असे सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहे. आता नाशिकमध्ये अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग आली आहे. 


नाशिकमधील झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या बाहेर लोखंडी सळ्या होत्या. या सळ्या तरुणांच्या शरीरात घुसल्याने पाच जणांचा जीव गेला. माल वाहतुकीच्या वाहनांना नियम असतात. मात्र हे नियम रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनांना लागू नाहीत का? सर्वसामान्यांवर केली जाणारी कारवाई मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर देखील तितक्याच प्रभावीपणे का लागू होत नाही? लोखंडी सळ्या अथवा एखादी कोणताही माल अवजड वाहनातून नेतांना एखादा कपडा किंवा वाहनाला रिफ्लेक्टर स्टेडियम का लावले जात नाही? आणि अशा नियमबाह्य वाहन चालक आणि संबंधितांवर पोलीस तात्काळ कारवाई का करत नाही?  असे एक ना अनेक प्रश्न आता या अपघातानंतर उपस्थित होत आहे. या अनुषंगाने नाशिक पोलसांनी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.    


धोकादायक पद्धतीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर होणार कारवाई


आता या अपघातानंतर नाशिक शहरात द्वारका परिसरात रविवारी झालेल्या अपघातानंतर नाशिक शहर वाहतूक पोलिसांकडून आता एक नवी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे. चंद्रकांत खांडवी म्हणाले की, नाशिकमध्ये एकूण आठ मार्ग शहरात येण्याचे आहेत. या आठही मार्गांवर जड मालवाहतूक होत असते. मुख्य शहरात दिवसा जड वाहतूक बंद असते. मुख्य हायवेवर जड वाहतूक 24 तास सुरू असते. काल नाशिकमध्ये दुःखद घटना घडली. या अनुषंगाने एक विशेष मोहीम राबवून जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर रिफ्लेक्टर, रेडियम न बसवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय धोकादायक पद्धतीने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग