नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रात्री आठ वाजता हा अपघात (Nashik Accident) घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण  सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे सर्वजण हे सर्वजण  निफाड तालुक्यातील धारणगाव येथे देवाचे कारण या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून महिलांचा टेम्पो आणि पुरुषांचा टेम्पो पुन्हा नाशिकच्या दिशेने परतत होते. त्यावेळी हा अपघात घडला.


द्वारका उड्डाणपुलावर या मुलांना घेऊन जात असलेला टेम्पो एका ट्रकला जोरात धडकला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअप ट्रकच्या काचा फोडून मागच्या भागात शिरल्या. या लोखंडी सळ्या थेट मागच्या भागात असलेल्या मुलांच्या अंगात शिरल्या. त्यामुळे त्यांच्या शरीरातून प्रचंड रक्तस्राव झाला. यामुळे सहा मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी दोघांचा सोमवारी पहाटेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. 


नाशिकमधील अपघाताचं खरं कारण समोर


लोखंडी सळ्यांनी भरलेला आयशर ट्रक रात्रीच्या अंधारात द्वारका उड्डाणपुलावरुन जात होता. या ट्रकच्या मागच्या बाजूला लाल दिवा किंवा कापड वा तत्सम कुठलेही निशाण लावलेले नव्हते. त्यामुळे टेम्पोचालकाला ट्रकमधील लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे दिसले नाही. त्यामुळे टेम्पो वेगाने जाऊन ट्रकच्या मागच्या बाजुला आदळला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. जोरदार धडक झाल्याने ट्रकमधील लोखंडी सळ्या टेम्पोच्या काचा फोडून आतमध्ये घुसल्या. या लोखंडी सळ्या मागच्या बाजूला असणाऱ्या मुलांच्या शरीरात शिरल्या आणि अनेकांचा जागीच मृत्यू झाला. हे सर्वजण सिडको, अंबड भागातील कामगार असून एकमेकांचे नातेवाईक होते. या घटनेमुळे सिडको आणि अंबड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


नाशिक अपघातामधील मृतांची आणि जखमींचे नावे खालीलप्रमाणे


मृतांची नावे 


१)अतुल संतोष मंडलिक (वय 22)
२) संतोष मंडलिक (56) 
३) यश खरात 
४) दर्शन घरटे 
५) चेतन पवार (वय 17)


 


जखमींची नावे 


1. सार्थक (लकी) सोनवणे
2. प्रेम मोरे
3. राहुल साबळे
4. विद्यानंद कांबळे
5. समीर गवई
6. अरमान खान
7. अनुज घरटे
8. साई काळे
9. मकरंद आहेर
10. कृष्णा भगत
11. शुभम डंगरे
12. अभिषेक
13. लोकेश 



आणखी वाचा


सोशल मीडियावर स्टेटस टाकलं अन् पुढच्या काही क्षणांत भीषण अपघात, लोखंड सळ्या अंगात शिरल्याने पोरसवदा तरुणांनी जागेवरच प्राण सोडला