Nashik Accident : नाशकातील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात झालाय. या अपघातात देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा कामगारांचा दुर्दैवी अंत झालाय. अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची दिली माहिती डॉक्टरांनी आहे. निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे.
आयशरला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअपची धडक
अधिकची माहिती अशी की, नाशकातील मुंबई -आग्रा महामार्गावर पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झालाय. लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिलीये. यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी अंत झालाय. या अपघातातील जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती आहे. नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती असून पोलिसांकडून त्यांची माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती आहे. अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत...
नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत
दरम्यान, नाशिक मुंबई अग्रा महामार्गावरील भीषण अपघातानंतर नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झालीये. उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाण पुलावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. उड्डाण पुलावर वाहतूक ठप्प झाल्याचे दिसून येत आहे..वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या असून गेल्या 30 मिनिट पासून ही वाहतूक ठप्प आहे...
नाशिक अपघाताची अपडेट
- अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी दिली माहिती
- पिकप आणि आयशर मध्ये झाला अपघात
- लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकप गाडीने दिली धडक
- जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती...
- नाशिकच्या सिडको परिसरातील अपघातग्रस्त असल्याची माहिती, अपघातग्रस्तांची पोलिसांकडून माहिती घेण्याचे प्रयत्न सुरू...
- निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणी परतत असताना अपघातात झाल्याची माहिती...
- अपघातग्रस्तांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात केले दाखल
- मुंबई नाका आणि भद्रकाली पोलीस अपघाताची चौकशी करत आहेत...
इतर महत्त्वाच्या बातम्या