नाशिक : शहर परिसरात आज सकाळपासून पावसाची (Rain) संततधार सुरु आहे. इगतपुरी (Igatpuri) आणि त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) होत असलेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात (Nashik Dam Position) वाढ होत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी तालुक्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला असून दारणा धरणातून (Darna Dam) पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
नाशिककरांची तहान भागावणाऱ्या गंगापूर धरणाचा (Gangapur Dam) पाणीसाठा 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. इगतपुरी तालुक्यातील पावसाचा जोर वाढल्याने दारणा धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. सकाळी 9 वाजेपासून दारणा धरणातून 9 हजार 334 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दारणा नदीत सुरु करण्यात आला आहे.
नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. दारणा धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडीच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नाशिकमध्ये आजपासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.
धरण | आजचा साठा | मागील वर्षीचा साठा |
गंगापूर (Gangapur Dam) | 70 | 80.44 |
कश्यपी (Kashyapi Dam) | 32.56 | 45.14 |
वाघाड (Waghad Dam) | 40.40 | 54.82 |
दारणा (Darna Dam) | 85.51 | 85.93 |
भावली (Bhaval Dami) | 100 | 100 |
गिरणा (Girna Dam) | 16.12 | 33.05 |
मुकणे (Mukne Dam) | 38.50 | 70.31 |
पालखेड (Palkhed Dam) | 54.06 | 62.63 |
कडवा (kadwa Dam) | 86.02 | 82.64 |
करंजवण (Karanjvan Dam) | 22.83 | 44.59 |
चणकापूर (Chankapur Dam) | 45.53 | 56.45 |
ओझरखेड (Ozarkhed Dam) | 0.00 | 0.00 |
वालदेवी (Waldevi Dam) | 78.02 | 92.23 |
भोजपुर (Bhojpur Dam) | 44.88 | 50.90 |
नांदूर मध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar Dam) | 100 | 91.05 |
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, जुलै महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर सहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला आहे. मात्र, आता उत्तर महाराष्ट्रात आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने देखील करण्यात आले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र विभागात चांगला पाऊस पडणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, अचलपूर, वाशिम, अकोला, अकोट, बुलढाणा, जालना, सिंदखेड राजा, सिल्लोड, वैजापूर, जळगाव, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
आणखी वाचा
Nashik Rain : नाशकात पावसाची जोरदार बॅटिंग, भावली ओव्हरफ्लो, दारणातून विसर्ग वाढवला