नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Notes) विक्री करणारे रॅकेट उघडकीस आलंय. याप्रकरणी तिघांना अंबड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून तर एक जण फरार झाला आहे. फरार आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आलीय.


याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस अंमलदार संदीप भुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अशोक अण्णा पगार (45, मु. पो. मेंढी ता. सिन्नर जि. नाशिक) हा नकली नोटा चलनात आणणार असून त्यासाठी  तो येणार असल्याचे समजले. ही माहिती भुरे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर व पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील पवार यांना दिली. यावरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक के.टी. रौंदळे, अंमलदार किरण गायकवाड, संदीप भुरे, सागर जाधव, राहुल जगझाप, घनश्याम भोये, सुचितसिंग सोळुंके, राकेश पाटील,पवन परदेशी, मते, राठोड, सचिन करंजे यांचे पथक तयार करून माऊली लॉन्स येथे सापळा रचला.


पाचशे रुपयाच्या बनावट तीस नोटा आढळल्या


पगारे हा माऊली लॉन्स येथे आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे पाचशे रुपये किमतीच्या बनावट तीस नोटा आढळल्या. यावरून पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी केली असता या गुन्ह्यात हेमंत कोल्हे, नंदकुमार मुरकुटे व भानुदास वाघ यांनी सिन्नर (Sinnar) येथील एका हॉटेलमध्ये बनावट नोटा बनवल्याचे सांगितले. 


तिघांना अटक एक फरार


यावरून पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरणाचे अधिकारी व अंमलदारांचे दोन तपास पथके तयार करून संशयित हेमंत लक्ष्मण कोल्हे (मुळ राहणार सिडको सध्या राहणार 32, रा. सेक्टर नंबर 10, आनंद निवास, प्लॉट नंबर १०१, पहिला मजला, वाशी, नवी मुंबई) यास नाशिक मधून अटक केली तर नंदकुमार तुकाराम मुरकुटे (52, रा. संजीवनी हॉस्पिटल मागे, सोनार गल्ली,ता. सिन्नर ,जि. नाशिक) यास सिन्नर येथून सापळा रचून अटक केली. तर चौथा संशयित भानुदास वाघ (रा. नांदूर शिंगोटे) हा फरार झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मालेगाव : अब्दुल मलिक गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, घटनास्थळी दोन्ही बाजूंनी फायरिंग, आतापर्यंत दोघांना बेड्या


मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा