नाशिक : मालेगावात माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा (Malegaon Former Mayor Abdul Malik Yunus Isa) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झाले. आता याप्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात (Malegaon Police Station) दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. दोन्ही बाजूकडून सहा राऊंड फायर करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक हे एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले होते. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळीबार (Firing) करून फरार झाले. या गोळीबारात अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण पसरले आहे. मालेगावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मालेगावमध्ये (Malegaon News) गोळीबाराच्या घटनेत सातत्यानं वाढ होत असल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.


दोन वेगवेगळे गुन्हे दाखल


आता या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस स्थानकात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला. दोन्ही बाजूकडून सहा राऊंड फायर करण्यात आले. जमिनीचे खरेदी-विक्री प्रकरण व पूर्व वैमस्यातून हा गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी, गावठी कट्ट्यासह दोन संशयितांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी दिली आहे.


मालेगावात गुंडाराज सुरू, मौलाना मुफ्तींचा आरोप


दरम्यान, एमआयएमसचे आमदार मौलाना मुफ्ती यांनी अब्दुल मलिक यांची भेट घेत घटनेची चौकशी केली आहे. तसेच, हल्लेखोरांना शोधून त्यांना अटक करण्याचीही मागणी आमदार मौलाना मुफ्ती यांनी केली आहे. त्यासोबतच मालेगावात गुंडाराज सुरू असल्याचे आरोप आमदार मुफ्ती यांनी केले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या 


मनमाड युनियन बँक घोटाळ्याची आमदार कांदेंकडून दखल, स्वतः फिर्यादी होत अधिकाऱ्यांविरोधात दाखल केला गुन्हा


Nashik Raid : नाशकात सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळाल्या नोटांच्या भिंती, रोकड मोजण्यासाठी 14 तास अन् नेण्यासाठी 7 गाड्यांचा वापर