Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) जेलरोड परिसरात राहणाऱ्या सुरेखा बेलकर या 60 वर्षीय महिलेच्या खुनाची (Murder) घटना होऊन चार दिवस उलटले आहेत मात्र अजूनही या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही. विशेष म्हणजे त्यांना सुनबाईला कॉल करुन नक्की काय सांगायचे होते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खून होण्याच्या काही तास आधी आजींनी सूनबाईला एक कॉल केला होत. मात्र सुनबाईचा कॉल बिझी असल्याने संपर्क होऊ शकला नव्हता, मात्र नंतर सूनबाईंनी अनेक वेळा कॉल बॅक करुनही त्यांनी कॉल उचलला नव्हता. सायंकाळी दूध देण्यासाठी आलेल्या दूधवाल्याने अनेक वेळा आवाज देऊनही सुरेखा बेलकर यांचा कुठलाही प्रतिसाद त्याला मिळाला नाही. अखेर त्याने सुरेखा यांचे नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांना हा प्रकार सांगताच घराचा मागील दरवाजा उघडा होता तर घरात सुरेखा बेलेकर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले तसेच त्यांच्या डोक्यावरही जखमा होत्या.
घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींचा शोध अद्याप लागलेला नसून पोलीस सर्व बाजूने सध्या तपास करत आहेत. विशेष म्हणजे आजीच्या हातातील दोन अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची माळही गायब असल्याने ही हत्या लूटमारीच्या उद्देशाने करण्यात आली का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक शहरात सध्या गुन्हेगारीने कळस गाठलेला असतानाच जेलरोड परिसरात 60 वर्षीय महिलेच्या डोक्यात हत्याराने वार करत हत्या केल्याची घटना समोर आली होती. सुरेखा श्रीधर बेलेकर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून त्यांच्या हातातील दोन अंगठ्या आणि गळ्यातील सोन्याची माळही गायब होती. सुरेखा राहत असलेल्या परिसरात त्यांची दोन मुले राहतात. दरम्यान रविवारी (18 जून) सायंकाळच्या सुमारास दूधवाला दूध देण्यासाठी आला आणि त्याने आवाज देऊनही घरातून कुठलाही प्रतिसाद त्याला मिळाला नाही. घरात टीव्ही सुरु असल्याचा आवाज आल्याने त्याने जवळच असलेल्या त्यांच्या मुलाशी संपर्क साधला. त्यानंतर मुलगा आणि सून इथे दाखल झाले आणि घराच्या मागे जाऊन बघितले असता मागील दरवाजा उघडाच होता तर घरात सुरेखा बेलेकर या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले तसेच डोक्यावरही जखमा होत्या. घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
संबंधित बातमी
Nashik Crime : नाशिक हादरलं! अंगावरील दागिने लुटून महिलेची निर्घृण हत्या, जेलरोड परिसरातील घटना