Nashik Crime News मनमाड : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच नाशिकच्या मनमाडमध्ये (Manmad) एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. 19 वर्षीय तरुणाने साडेतीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याने मनमाडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी (Police) तरुणाला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या मनमाडमध्ये भाडोत्री राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणाने घरमालकाच्या साडेतीन वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनमाडच्या शांतीनगर भागात हा घृणास्पद प्रकार घडला आहे.


19 वर्षीय नराधमाला बेड्या


पिडीत मुलाच्या वडिलांनी या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. दरम्यान, लैंगिक अत्याचार करणाऱ्या संशयित हर्षल भालेराव या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास मनमाड पोलीस करत आहे. या घटनेमुळे मनमाडमध्ये संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. 


नाशिकमध्ये खासगी क्लासच्या शिक्षकाकडून 10 वर्षीय मुलीचा विनयभंग


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नाशिकच्या सिडको (Cidco) परिसरात  10 वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग (Nashik Crime) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच (Teacher) विनयभंग केला आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणारी मुलगी क्लासरूममध्ये एकटी होती. तेव्हा संबंधित शिक्षकाने तिच्यासोबत गैरवर्तन केले. उपेंद्रनगरमधील एका खासगी ट्युशन सेंटरमधून हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांच्या तक्रारीनंतर संशयित शिक्षकाला अंबड पोलिसांनी अटक केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना


Sangli Crime News : पॅरोलवर असलेल्या गुन्हेगाराकडून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार; सांगली शहरातील संतापजनक घटना