Nashik Crime : साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा करण्यात नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. जमिनीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे उघड झाले आहे. साल्हेर किल्ल्यावर दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले होते. त्यानंतर याबाबत तपास सुरु करण्यात आला होता. अखेर पोलीस तपासातून मोठा खुलासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी साल्हेर किल्ल्याच्या पठारावर दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले होते, त्यानंतर आज (दि.25) याबाबत मोठा खुलासा झालाय.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
याबाबत अधिकची माहिती अशी की, साल्हेर किल्ल्यावर दोन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळाले होते. मृतदेहांवरील कपडे आणि जवळील वस्तूंवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. रामभाऊ वाघ आणि नरेश पवार अशी मृत व्यक्तींची नावे असल्याचे समोर आले आहे. दोघांवर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. घटनेबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीणचे नीती गणापुरे यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व जायखेडा पोलिसांना सूचना दिल्या. वाघ आणि पवार हे 13 नोव्हेंबर रोजी कळवण परिसरातून सटाण्याच्या दिशेने मोटार सायकलीने गेल्याची माहिती मिळाली. गुन्हे तरहेर किल्ला, केळझर धरण परिसरात पाळत ठेवून संशयितांना ताब्यात घेतले. हा वाद जमिनीच्या वादातून झालीच पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
संशयित आरोपींची नावे ?
साल्हेर किल्ल्याच्या पठारावर निर्जनस्थळी झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. विश्वास दामू देशमुख ( वय 36, रा. केळझर, ता. सटाणा), तानाजी आनंदा पवार (वय 36, रा. खालप, ता. देवळा), शरद उर्फ बारकु दुगाजी गांगुर्डे (वय 30, रा. बागडु, ता. कळवण), सोमनाथ मोतीराम वाघ (वय 50), गोपीनाथ सोमनाथ वाघ (28, दोघे रा. गोपाळखडी, ता. कळवण) व अशोक महादू भोये (35, रा. सावरपाडा, ता. कळवण), अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या