नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने (Mahayuti) 288 पैकी 236 जागा जिंकत नवा इतिहास रचला आहे. महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अक्षरशः धुव्वा उडाला. महायुतीत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप (BJP) हा पहिला पक्ष ठरला आहे. नाशिक जिल्ह्यातही महायुतीने करिष्मा केला. 15 विधानसभा मतदारसंघांपैकी 14 मतदारसंघात महायुतीचे उमेदवार निवडून आले. तर एक जागा एमआयएम पक्षाने जिंकली. नाशिक जिल्ह्यात एकूण 196 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी तब्बल १०८ उमेदवारांची अनामत रक्कम अर्थात डिपॉझिट जप्त झाले आहे.
जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील चार माजी आमदारांसह 108 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. कारण नाशकातील सर्वच विजयी उमेदवारांनी एक लाखापेक्षा अधिकची मते मिळवली आहेत. माजी आमदार शिरीष कोतवाल, निर्मला गावित, दीपिका चव्हाण, काशिनाथ मेंगाळ या चार माजी आमदारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. तसेच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून 11, मालेगाव बाह्यमधून 15, निफाड - 7, इगतपुरी - 16, दिंडोरी - 11, सिन्नर - 10, कळवण - 5, नांदगाव - 11, चांदवड - 10, येवला - 10, बागलाण - 16 आदी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
अनामत रक्कम किती?
लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार लोकसभेच्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडे 25 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते आहे. प्रवर्ग श्रेणीमधील उमेदवारांना 12,500 रुपये भरावे लागतात. विधानसभेच्या उमेदवारांना 10 हजार तर प्रवर्गासाठी 5 हजार रुपये रुपये भरावे लागतात.
कोणाची अनामत होते जप्त ?
मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाच्या 16.66% मते न मिळालेल्या मतदारांची अनामत रक्कम जप्त होते. तर 1/6 टक्के मते मिळालेल्या उमेदवाराला तसेच मुदतीत अर्ज मागे घेणाऱ्यांना अनामत रक्कम परत मिळते.
नाशिक जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी
1. दिंडोरी
- नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- पडलेली मते : 138442
- सुनिता चारोस्कर (राष्ट्रवादी शरद पवार)
- एकूण पडलेली मते 93910
- नरहरी झिरवाळ 44532 मतांनी विजयी
2. नाशिक पूर्व
- राहुल ढिकले (भाजप)
- एकूण पडलेली मते : 156246
- गणेश गीते (राष्ट्रवादी शरद पवार)
- एकूण पडलेली मते 68429
- राहुल ढिकले 87571 मतांनी विजयी
3. नाशिक मध्य
- देवयानी फरांदे (भाजप)
- एकूण पडलेली मते : 104986
- वसंत गिते (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते 87151
- देवयानी फरांदे 17835 मतांनी विजयी
4. नाशिक पश्चिम
- सीमा हिरे (भाजप)
- एकूण पडलेली मते : 140773
- सुधाकर बडगुजर (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 72661
- सीमा हिरे 68116 मतांनी विजयी
5. देवळाली
- सरोज अहिरे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- एकूण पडलेली मते : 81297
- राजश्री अहिरराव (शिंदेची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 40463
- योगेश घोलप (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 38710
- सरोज अहिरे : 40463 मतांनी विजयी
6. कळवण
- नितीन पवार (राष्ट्रवादी अजित पवार)
- एकूण पडलेली मते : 118366
- जे पी गावित
- एकूण पडलेली मते : 109847
- नितीन पवार 8519 मतांनी विजयी
7. इगतपुरी
- हिरामण खोसकर (राष्ट्रवादी अजित पवार)
- एकूण पडलेली मते : 117214
- लकी भाऊ जाधव (काँग्रेस)
- एकूण पडलेली मते : 30707
- हिरामण खोसकर मतांनी 86507 मतांनी विजयी
8. सिन्नर
- माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- एकूण पडलेली मते : 138565
- उदय सांगळे (राष्ट्रवादी शरद पवार गट)
- एकूण पडलेली मते : 97681
- माणिकराव कोकाटे 40884 मतांनी विजयी
9. निफाड
- दिलीप बनकर (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- एकूण पडलेली मते : 120253
- अनिल कदम (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 91014
- दिलीप बनकर 29239 मतांनी विजयी
10. येवला
- छगन भुजबळ (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- एकूण पडलेली मते : 114118
- माणिकराव शिंदे (राष्ट्रवादी अजित पवार गट)
- एकूण पडलेली मते : 90535
- छगन भुजबळ 23583 मतांनी विजयी
11. मालेगाव बाह्य
- दादा भुसे (शिंदेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 151320
- बंडू काका बच्छाव (अपक्ष)
- एकूण पडलेली मते : 48880
- अद्वय हिरे (ठाकरेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 36553
- दादा भुसे 102440 मतांनी विजयी
12. मालेगाव मध्य
- आसिफ शेख (अपक्ष)
- एकूण पडलेली मते :
- मौलाना मुफ्ती इस्माईल (एमआयएम)
- एकूण पडलेली मते
- मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल एम आय एम विजयी
13. बागलाण
- दिलीप बोरसे (भाजप)
- एकूण पडलेली मते : 159681
- दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी शरद पवार)
- एकूण पडलेली मते : 30384
- दिलीप बोरसे 129297 मतांनी विजयी
14. चांदवड - देवळा
- डॉ राहुल आहेर (भाजप)
- एकूण पडलेली मते : 104003
- गणेश निंबाळकर (प्रहार)
- एकूण पडलेली मते : 55460
- डॉ राहुल आहेर 48563 मतांनी विजयी
15. नांदगाव
- सुहास कांदे (शिंदेंची शिवसेना)
- एकूण पडलेली मते : 138068
- समीर भुजबळ (अपक्ष)
- एकूण पडलेली मते : 48194
- सुहास कांदे 89874 मतांनी विजयी
आणखी वाचा