नाशिक : शेअर मार्केटमध्ये (Share Market) मोठ्या प्रमाणात नफा (Profit) कमावण्याचे आमिष दाखवून सायबर (Cyber Crime) भामट्यांनी फिर्यादीसह साक्षीदारांना सुमारे 95 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे नाशिकमध्ये (Nashik Fraud News) एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एका शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याच्यासह इतर तिघा व्यावसायिक आणि नोकरदारांना जुलै 2023 ते मे 2024 या कालावधीत व्हाटस्अॅप (WhatsApp) आणि टेलिग्रामवरुन (Telegram) सायबर भामट्यांनी संपर्क केला. यानंतर त्यांना टेलिग्रामसह त्यातील चॅनलला अॅड करुन घेत शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा आणि परतावा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले.
शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत असल्याचा विश्वास बसला अन्...
त्यानंतर शेतकऱ्यासह इतरांनी संशयितांच्या आमिषाला बळी पडून पैसे गुंतवण्याचे ठरवले. त्यांना एक लिंक पाठवून व्हॉट्सअॅपवर जॉईन होण्यास सांगण्यात आले. ग्रुप जॉइन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यांना अॅप्लिकेशन डाऊनलोड करून गुंतवणूक करण्यास शेतकऱ्यासह इतरांनी सुरुवात केली. यानंतर त्यांना काही प्रमाणात मोबदला देण्यात आला. तो बँक खात्यात दिसत असल्याने चौघांना शेअर ट्रेडिंगमधून फायदा होत आहे, असा विश्वास बसला आणि त्यांनी अधिक पैशांची गुंतवणूक सुरु केली.
94 लाख 86 हजारांची फसवणूक
चौघांनी एकूण 94 लाख 86 हजार रुपये विविध बँक खात्यांत वर्ग केले. काही काळानंतर त्यांना ते पैसे काढण्यास अडचणी येऊ लागल्याने त्यांनी सायबर भामट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुन्हा एका चौघांना अधिक परताव्याचे आमिष दाखवण्यात आले. मात्र आपले पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर शेतकऱ्यासह इतरांनी शहर सायबर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या