Nashik Accident : नाशिक जिल्ह्यातील मनमाडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका धावत्या ट्रकने दोन शाळकरी मुलांना चिरडले आहे. यामध्ये दोन्ही शाळकरी मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर ही घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर दोन्ही विद्यार्थी घरी जात असताना हा अपघात झाला आहे. वैष्णवी केकाण व आदित्य सोळसे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही दहावीचे विद्यार्थी होते. 


नाशिकच्या मनमाडच्या कृषी उत्पन्न बाजार समिती समोर धक्कादायक घटना घडली आहे. एका ट्रकने 2 शाळकरी मुलांना चिरडलं आहे. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Accident : सोलापूर धुळे मार्गावर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पती पत्नीसह चौघांचा अंत; कारने पाठीमागून धडक दिल्याने अपघात