Nashik Accident : नाशिकच्या लासलगाव-विंचूर रस्त्यावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


लासलगाव - विंचूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी


दरम्यान, लासलगाव - विंचूर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. लासलगाव - विंचूर रस्त्यावरील पालखेड कालव्याजवळ दुचाकी व कारची समोरासमोर धडक झाली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. दुचाकीवरील एक व कारमधील एक असे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर लासलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. लासलगाव - विंचूर या रस्त्यावर वाढत्या अपघाताच्या मालिका सुरु असल्यानं या रस्त्याचे लवकरच चौपदरीकरण व्हावे अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.


गेल्या आठवड्यातच नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना


गेल्या आठवड्यातच नाशिकमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडलवी होती. नाशकातील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा कामगारांचा दुर्दैवी अंत झाला होता. निफाड येथील एका देवदर्शनच्या ठिकाणाहून परतत असताना अपघातात झाल्याची माहिती समोर आली होती. लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिलीये. यामध्ये सहा जणांचा दुर्दैवी अंत झालाय. या अपघातातील जखमी आणि मयत सर्व कामगार असल्याची माहिती आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Nashik Accident : नाशकात पिकअप अन् आयशरचा भीषण अपघात, देवदर्शनाहून परतत असलेल्या सहा जणांचा मृत्यू