नाशिक :  नाशिकच्या त्र्यंबक (Nashik Accident)  राजाचे दर्शन घेऊन येणाऱ्या मामा भाच्याचा दुचाकीचा भीषण अपघात  झाला आहे.  चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने  हा भीषण अपघात  झाला आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.  दुचाकीवर मामा भाचे त्र्यंबक राजाचं (Trimbakeshwar) दर्शन घेऊन घरी परत असताना महिरावणी गावाजवळ चार चाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.  सुदैवाने कोणतीही  जीवितहानी झाली नाही. मामा - भाचा  दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


 रियांश संदीप कदम  (9 वर्ष) अस भाच्याचे नाव आहे. तर नितीन शांताराम भांगरे ( 45 वर्षे)  असे मामाचे नाव आहे.  विशेष बाब म्हणजे अपघात होऊन 14 ते 15 तास उलटून गेले असताना ग्रामीण पोलिसांना जाग आली आहे.  अपघातग्रस्तांनी ऑनलाईन तक्रार दिल्यानंतर आज सकाळी पोलीस  चौकशीसाठी रुग्णालयात दाखल झाले. यामुळे पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. घटना घडली यावेळी दुचाकी स्वारांचा अपघात करून चारचाकी वाहनधारक तिथून पलायन करत होते.  मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेने या चारचाकी वाहनधारकांना त्यांनी पकडून अपघातग्रस्तांसोबत रुग्णालयात पाठवले. तब्बल 14 ते 15 तासाने ग्रामीण पोलीस अपघातग्रस्तांची पाहणी आणि विचारपूस करण्यासाठी आल्याने ग्रामीण पोलिसांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


रस्त्याच्या दूरवस्थेमुळे अनेक अपघात


सुटीच्या दिवशी त्र्यंबकमध्ये दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी अनेक नागरिक दररोज या ठिकाणी येत असतात. रस्त्याची असलेल्या दूरवस्थेमुळे येथे अनेक अपघात देखील होतांना पाहायला मिळतात. मात्र अपघात होऊन देखील रुग्णवाहिका आणि पोलीस कर्मचारी हे वेळेत येत नसल्याने अपघातग्रस्तांसह स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


नाशकात गेल्या महिन्याभरात सात ते आठ हिट अँड रनच्या घटना


नाशकात गेल्या महिन्याभरात सात ते आठ हिट अँड रनच्या घटना घडल्या आहे. यात तब्बल सहा ते सात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र या घटनेने स्थानिक नागरिकांनी अपघात करून पळून जाणाऱ्या या चारचाकी वाहनधारकांना पकडल्याने हे अपघात करणारे सापडले आहेत, नाहीतर हे देखील पळून जाण्याच्या तयारीत होते. 


हे ही वाचा :


 त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी ऑनलाईन पास देण्याचे विचाराधीन, VIP दर्शनासाठी शुल्कवाढ होण्याची शक्यता