Nashik, मालेगाव : मासे पकडण्यासाठी गेलेले असताना अचानक पाणी वाढल्याने गिरणा नदीत 12 ते 13 जण अडकले आहेत. मालेगाव तालुक्यातील सवंदगाव शिवारात गिरणा नदीच्या पाण्यात 12 ते 13 जण अडकले आहेत. गिरणा नदीत मासे पकडण्यासाठी गेल्यावर अचानक पाणी विसर्ग वाढल्याने नदी पात्राच्या मधोमध थांबावे लागले आहे. त्यामुळे मासेमारीची हौस जीवावर बेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान 13 जणांच्या बचावसाठी मालेगाव अग्निशमन दल पोहचले असून मासेमारांना पाण्यात बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचा प्रयत्न सुरू आहे. 


नाशिक शहरात गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली, रामकुंड परिसरातील छोटे दुकान पाण्याखाली


नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून संताधार पावसाला सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणात देखील जवळपास 80 टक्के इतका पाणीसाठा झाला असून गंगापूर धरणातून गोदावरीत सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय. रामकुंड परिसरातील गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडी असून गोदापात्राच्या बाहेर सराफ बाजार भांडी बाजारात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. छोटे दुकानात पाणी शिरत असल्याने आता दुकानदार आपले दुकाना सुरक्षित स्थळी हलवत आहे.


मुसळधार पावसामुळे गेल्या 3 ते 4 तासापासून तासांपासून नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विल्होळी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळतेय. वाहतूक कोंडीने वाहनचालकांचे मोठे हाल झाले आहेत. 


गोदावरीला सकाळपासून पूरसदृश्य परिस्थिती, पूर बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी


नाशिक मध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जातो आहे. सायंकाळी सहा वाजता सहा हजार किंवा पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील छोटे मोठे मंदिर आता पाण्याखाली गेले आहेत, तर धुंड्या मारुतीच्या जवळपास छातीच्या वरती पाणी लागल्याची प्रत निर्माण झाली आहे. नाशिक शहरातील गोदावरी नदीवरील सर्वात मोठा पूल समजला जाणारा अहिल्याबाई होळकर पुलावर्ती  नाशिक कर पूर बघण्यासाठी मोठी गर्दी करत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून गोदावरीची पाणी पातळी वाढत असून प्रशासनाच्या माध्यमातून सकाळपासून गोदाकाच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र पूर बघण्यासाठी नाशिककर आपला जीव धोक्यात घालून गर्दी करत असल्याचं पाहायला मिळत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Ajit Pawar : लाईट बील तर भरायचा प्रश्नच नाही, पण आता आकडे टाकायचं बंद करा, मेहरबानी करा; अजितदादांचे आवाहन