मुंबई : आपल्याला पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागायचं आहे. आज तुमच्याकडून एकच शब्द हवा आहे की पुढील 1 वर्ष आपल्याला तळागाळात जाऊन काम करायचं आहे.  कारण महिला सत्ता आणू शकतात आणि उलथवू देखील शकतात. आपल्या 83 वर्षीय योध्याला यांनी निवडणुकात आयोगात खेचलं हे मनाला अजिबात पटलेले नाही. त्यामुळं आपण सर्वांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पाठीशी उभ राहायचं असल्याचा निर्धार राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केला आहे. 


आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत महिला कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना संबोधित केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला झटून काम करायचे असून आपल्या पाठीशी शरद पवार यांच्यासारखा योद्धा असताना आपण कुठेही कमी पडता कामा नये, आम्ही पाच जिल्ह्याचां प्रवास केला, आम्हाला जाणवलं की पवार साहेब म्हटल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (National Congress) पक्ष म्हटलं की शरद पवार नाव समोर येतं. त्यामुळं कुणीही त्याला वेगळं करु शकत नाही, त्यामुळे ही लढाई आपल्याला लढावीच लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही, असे सूतोवाच रोहिणी खडसे यांनी दिले आहे. 


रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या की, आज शरद पवार यांच्यामुळे ग्रामपंचायत असो की विधानसभा केवळ शरद पवार यांच्यामुळे महिलांना निवडणूक लढता येते आहे. मला आज तुमच्याकडून एकच शब्द हवा आहे की पुढील 1 वर्ष आपल्याला तळागाळात जाऊन काम करायचं आहे. कारण महिला सत्ता आणू शकतो आणि उलथवू देखील शकतो. आपल्या 83 वर्षीय योध्याला यांनी निवडणुकात आयोगात खेचलं हे मनाला अजिबात पटलेले नाही. त्यामुळं आपण सर्वांनी शरद पवार यांच्या पाठीशी उभ रहायचं असून यासाठी सध्या आपल्या पक्षाचे सगळे नेते फिरत आहेत. त्यामुळे आपण गप्प बसायला नको. बूथ रचना, कार्यकर्ते जोडा, मेळावे घेऊयात. आपली ताकद निवडणुकीतून दाखवून देऊ असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला आहे. 


शरद पवारांमुळे महिलांना सन्मान 


आज शरद पवार यांच्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या महिलांना सन्मानाने वागणूक मिळतं आहे. राज्य महिला आयोगाची निर्मिती देखील शरद पवारांनी केली. त्यामुळं महिलांना आपल्या अडचणी त्यांच्या समोर मांडता येऊ लागल्या. सैन्य दलात 11 टक्के आरक्षण देखील संरक्षण मंत्री असताना मिळवून दिलं. महिलांना मालमत्तेत समान अधिकार मिळवून देण्याचा अधिकार देखील त्यांनी मिळवून दिला. महिला बचत गटांची निर्मिती करण्याचं काम शरद पवार यांनी केली आहे. यासह शरद पवार यांनी केलेले निर्णय तळागाळात पोहचवायचे आहे. जे आपण केलेलं आहे ते पोहचवायलाच हवं. केंद्राने सांगितलं आम्ही महिलांना आरक्षण दिलं, माञ त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला सुरक्षा पहिल्यांदा द्या, असा सवालही यावेळी खडसे यांनी उपस्थित केला.