Raj Thackeray : गेल्या 18 अनेक चढ उतार आले आहेत. या चढउतारात आपण माझ्यासोबत हे समाधान आहे. यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत, सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय. पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. नाशिक येथे मनसेचा 18 वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. 


राज ठाकरे म्हणाले की, सोशल मिडिया कसा वापरला पाहिजे. राजकारणासाठी आपण कसा वापर केला पाहिजे. हे त्यांनी सांगितले हे खरच आहे. माझ्याही बाबीत टाकतात. सोशल मिडीयाचा वापर लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी करा, तुम्ही जर पक्षाच्या नावाने जर सोशल मिडियावर कन्टेन्ट टाकणार असाल तर ते कोणी पाहत नाही. त्यातून जर काही मिळणार असेल तरच लोक ते पाहतात. महाराष्ट्रात मी सोशल मिडियाचे शिबीर भरवणार आहे. 


1952 सालापासून झटणाऱ्या खस्ता खाणाऱ्यांचे यश म्हणजे 2014


ते पुढे म्हणाले की, यंदा नाशिकमध्ये वर्धापन दिन पार पडत आहे. या निमित्त राजकीय इतिहास सांगणे आवश्यक आहे. वडा टाकला की तळून आला पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेव्हल ला गेल्या आहेत. राजकारणात जर टिकायचे असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स. आजूबाजूच्या पक्षाचे यश तुम्ही आता पाहताय. नरेंद्र मोदींचे यश तुम्ही 2014 पासून पाहत आहे. पण त्यासाठी अनेक लोकांनी परिश्रम घेतले आहे. 1952 सालापासून झटणाऱ्या खस्ता खाणाऱ्यांचे यश म्हणजे 2014 आहे. 


मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळावायची आहेत


गेल्या 18 अनेक चढ उतार आले आहेत. या चढउतारात आपण माझ्यासोबत हे समाधान आहे. यश हे मी तुम्हाला मिळवून देणार हा माझा शब्द आहे. मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळावायची आहेत. सध्या राजकारणात दुसऱ्याची पोर कडेवर घेऊन खेळवताय. पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद माझ्यात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून येणाऱ्या माणसाची मोळी


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही. निवडून येणाऱ्या माणसाची मोळी आहे. शरद पवार हेच करत आले आहेत. ते वेगळे झाले तरी निवडून येणार आहेत. राज्यात कुठले पक्ष स्थापन झाले असतील तर जनसंघ, शिवसेना आणि मनसे हे पक्ष स्थापन झाले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


पंतप्रधान फुलं वाहून गेले त्याचं पुढे काय झालं?


महाराजांच्या वेळी सोशल मीडिया नव्हता हे नशीब आहे. पत्रकार ही नव्हते, नशीब.  नाहीतर गनिमीकावा कसा करतात हे विचारले असते. मला भरपूर गोष्टी बोलायचे आहे पण मी गुढीपाडव्याला शिवतीर्थावर बोलणार आहे. माझ्या सहकाऱ्यांनी आंदोलन केले. लाठ्या काठ्या खाल्ल्या आहेत. स्वतःच्या अंगावार केसेस घेतल्या आहेत. सुरुवात करतात शेवट करत नाहीत, असा आरोप आपल्यावर केला जातो. अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही? पंतप्रधान फुलं वाहून गेले त्याचं पुढे काय झालं? मनसे सुरू केरते तसा शेवटही करते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 


आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक


आमची भूमिका स्वच्छ प्रामाणिक आहे. मुंबई-गोवा रस्ता, मुंबई-नाशिक रस्ता भीषण आहे आणि तुम्ही टोल घेता? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात 17 हजार मुलांवर केस केल्यात. 


...तर सर्व भोंगे काढणार


ज्या भोंग्यांचा मुस्लिम समाजातील लोकांनाही त्रास होतो. त्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकतात? एकदा माझ्या हातात सरकार द्या, सर्व भोंगे काढतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. समुद्रात दर्गा बांधत होते. एका रात्रीत ती काढली. पालिका, पोलिसांच्या का लक्षात आलं नाही? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. 


विश्वास टिकवणे गरजेचं


18 वर्षात आपण जेवढी आंदोलने केली तेवढी इतर कोणत्याही पक्षानं केली नाही.  यावर पुस्तिका काढली आहे, ति लोकापर्यंत पोहोचवा. लोक हात धरतात तुझ्यावर विश्वास आहे म्हणतात.  तो विश्वास टिकवणे गरजेचं आहे. आता कोणाचे नाव घेतले तर कुठे आहेत हे विचारावे लागते. मागे एका कार्यक्रमात 5 नगरसेवक भेटले होते. त्यापैकी 3 शरद पवार आणि 2 अजित पवार गटाचे होते. माझे ठाम मत आहे की, हे सर्व आतून एकच आहेत. 


तुमच्यात विष कालविण्याचा प्रयत्न सुरू


ते पुढे म्हणाले की, जरांगे पाटील यांना सांगितले हे होणार नाही, तांत्रिकदृष्ट्या होणार नाही, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. जी गोष्ट होऊ शकत नाही त्याचे आश्वासन सरकार देत आहे. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य शिक्षण रोजगार देऊ शकत नाही. बाहेरील राज्याचे लोक पोसायची आणि आम्ही आंदोलन करायची. जातीजातीत विष कालवले जात आहे. महाराष्ट्र एकसंघ ठेवत नाही. तुम्ही मराठी म्हणून एकत्र आलेत हे यांना नकोय. तुमच्यात विष कालविण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


माझ्या पक्षात जातीपातीने एकमेकांकडे बघणारे मला चालणार नाही


अरबी समुद्रातील शिवाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्याचा विषय आला तेव्हा मी सांगितले असे होणार नाही. समुद्र आहे तो. तिथे भर घालण्यासाठी किमान 25 ते 30 हजार कोटी लागतील. शिवाजी महाराजांनी उभे केलेले गड किल्ले स्मारक आहे. येणाऱ्या पिढीला पुतळे दाखविणार का? गड किल्ले उभे राहिले तर इतिहास दाखवू शकू. काँग्रेस सरकार, शिवसेना भाजप आणि आताचे सरकार तेच सांगत आहे. जे जे काही शक्य असेल ते या महाराष्ट्र, हिंदू समाज आणि मराठी माणसासाठी करू. आताच्या राजकारणातून हाती काही लागणार नाही. आपल्याला महाराष्ट्र घडवायचाय. माझ्या पक्षात जातीपातीने एकमेकांकडे बघणारे मला चालणार नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 


आणखी वाचा 


Sunetra Pawar baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर? परिचय पत्रकात सुनेत्रा पवारांनी केलेल्या कामाचा उल्लेख