Nashik Accident : नाशिक (Nashik) शहराला अपघात मुक्त करू (Accident) अशी घोषणा नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली. मात्र शहरातील अपघातांची परिस्थिती जैसे थे असून रोजच अपघात घडत आहेत. दरम्यान बस अपघातानंतर करण्यात आलेल्या चौकशी अहवालातून शहरात 26 ब्लॅक स्पॉट (Black Spot) आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या ब्लॅक स्पॉटच्या परिसरात 65 टक्के दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू होत आहे. 


नाशिकमध्ये ऑक्टोबर महिन्यात औरंगाबाद रोडवरील मिर्ची चौक (Mirchi Hotel) येथे झालेल्या भीषण अपघातात खासगी बसमधील तेरा प्रवाशांचा जळून होरपळून मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने दखल घेत महापालिका हद्दित किती ब्लॅक स्पाॅट असून त्यावर उपाययोजनांच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने ही माहिती गोळा करणे व त्यावर उपाय सुचविण्यासाठी इंडिया रेझिलियंट या संस्थेकडून सर्वेक्षण करुन घेतले. चाळीस दिवसाच्या अभ्यासानंतर या संस्थेचा अहवाल तयार झाला आहे. या अभ्यासात शहरात तब्बल 26 ब्लॅक स्पाट आढळले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या ब्लॅक स्पॉटच्या परिसरात 65 टक्के दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू होत आहे.


औरंगाबाद रोडवरील बस अपघातानंतर रेझिलियंट इंडिया या संस्थेच्या मा ध्यमातून चौकशी अहवाल तयार करण्यात आला आहे. या संस्थेने सहाशे पानांचा सविस्तर अहवाल तयार केला असून तो महापालिका आयुक्त डाॅ.पुलकुंडवार यांना सादर केला जाणार आहे. लवकरच या अहवालातील सूचनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. शहरात असलेल्या विविध ठिकाणच्या ब्लॅक स्पॉटवर 45 टक्के अपघात हेल्मेट परिधान न केल्याने, 25 टक्के अपघात मोबाईलमुळे झाल्याचे समोर आले आहे.तर 27 टक्के पादचारी यांचे आहे. मिर्ची चौकातील ब्लॅक स्पाॅटवर अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुल बांधावा असा पर्याय या संस्थेने दिला आहे. त्यात मिर्ची चौक ते नांदूरनाका असा दीड किलोमीटरचा उड्डाणपूल बांधावा. अथवा नांदूरनाका, सिध्दिविनायक चौक व मिर्ची चौक या तीन ठिकाणी छोटे उड्डाणपूल बांधावे असे सांगण्यात आले आहे. शहरात जेथे महापालिकेचे रस्ते, राज्य व राष्ट्रिय महामार्ग एकत्र येतात अशा स्पाॅटवर अपघाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. 


उदाहरण म्हणजे द्वारका सर्कल. ही समस्या सोडविण्यासाठी शहराच्या बाहेर पडणारी अवजड वाहनाच्या  वाहतूकीसाठी रिंगरोडद्वारे हा पर्याय सुचविण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे वाहतुकिला शिस्त लागावी यासाठी 26 ब्लॅक स्पाॅटवर सिग्नल यंत्रणा कार्यन्वित करावी हा यासाठी आग्रह धरण्यात आला आहे. शिवाय मुंबई व पुण्याच्या धर्तीवर वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणार्‍य‍ा बेशिस्त वाहनचालकांसाठी इ चलन ही यंत्रणा कार्यन्वित करावी, हा देखील पर्याय सुचविण्यात आला आहे. शहर व उपनगरीय परिसरात  असून वर्षाला जवळपास अपघात टाळण्यासाठी वरील ठिकाणी सिग्नल यंत्रणेसह स्पीड मीटर बसवणे व वाहतुकिला शिस्त लागावी यासाठी ई चलन यंत्रणा अंमलात आणणे, असे  पर्याय सुचविण्यात आला आहे. 


अशा उपाययोजना आवश्यक 
नाशिक शहरातील वर्दळीचा द्वारका सिग्नल, मुंबईनाका सर्कल, गडकरी चौक, नांदूरनाका, सिध्दिविनायक चौक, मिर्ची चौक, नाशिकरोड येथील दत्त मंदिर सिग्नल, उपनगर सिग्नल, फेम मल्टिपेल्स सिग्नल यांसह 26 ब्लॅक स्पाॅटचा बारकाईने अभ्यास करुन अपघात कारणाची सखोल मिमांसा केली आहे. येथील अपघात टाळण्यासाठी पर्याय सुचवले आहेत. त्यात प्रामुख्याने जुने गतिरोधक काढून त्याऐवजी सीबीएस येथील स्मार्ट रोडसारखे स्पीड ब्रेकर बसवावे असा पर्याय देण्यात आला आहे. जुन्या गतिरोधकावर वाहनांचा स्पीड कंट्रोल होत नाही व त्यामुळे बहुतांश अपघात घडतात हे प्रमुख कारण समोर आले आहे. शिवाय दृश्यमानता वाढविण्यासाठी हायमास्ट लावणे, दुभाजक बसवणे, मार्गदर्शक सूचना फलक, स्पीड तपासण्यासाठी सीसीटिव्ही लावणे, पादचार्‍यांसाठी फुटपाथची व्यवस्था, चौकातील वाहतुकिला अडथळा ठरणारे अतिक्रमण हटवणे आदी उपाय सुचविण्यात आले आहे. 



तीन वर्षाची अपघाताची टक्केवारी
दरम्यान नाशिक शहरात  मागील तीन वर्षांची आकडेवारी पहिली असता सर्वाधिक अपघात हे  याच वर्षात झाल्याचे निदर्शनास येते. यामध्ये 2019 - 20 मध्ये  55 दुचाकीचे अपघात तर 27 रस्त्याने पायी चालणाऱ्यांचे अपघात, 2020- 21 मध्ये दुचाकींचे 62 अपघात तर 26 रस्त्याने जाणाऱ्यांचे, 2021- 22 दुचाकींचे 65  तर 28 पादचाऱ्यांचे अपघात झाल्याचे समोर आले आहे.