Sanjay Raut : सकाळी उठायचं, टीव्हीवर यायचं, विकासाचा मुद्दा बाजूलाच, 50 आमदार जेव्हा गेले, तेव्हा त्यांच्यावरही राउतांनी आरोप केले, कदाचित आमदार परत आले असते, त्यामुळे एखाद्या टोपलीतून सडका कांदा बाहेर काढायला पाहिजे तसे राऊतांना बाजूला करा असा सणसणीत टोला हेमंत गोडसेंनी संजय राऊतांना लगावला आहे. एकनाथ शिंदे बाहेर पडल्यापासून शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली असून एकप्रकारे दुफळी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. त्यातच बारा खासदारांनी देखील शिंदे गटाची वाट धरल्याने शिवसेना अधिकच खिळखिळी झाली आहे. यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे देखील आहेत. दरम्यान दिल्लीच्या बैठकीनंतर हेमंत गोडसे प्रथमच नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी समर्थकांची संवाद साधण्यासाठी मेळावा घेतला. यावेळी त्यांनी संजय राऊततांसह आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली.


यावेळी ते म्हणाले की, चाळीतील एक कांदा सडला तर अख्खी चाळ खराब करतो, त्याला बाजूला काढले तर चाळीतील सर्व कांदे सूरक्षित राहतात. त्यामुळे पक्ष श्रेष्टींनी यावर विचार करून पुन्हा एक संघ होता येईल, असे  सुतोवाच खासदार हेमंत गोडसे यांनी नाव न घेता खा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. आज नाशिक शहरात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना खासदार गोडसे म्हणाले की, हिंदू हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी  प्रेरित होऊन आपण हिंदुत्वाचा झेंडे हाती घेतला होता. त्याच मार्गाने पुढे जात असताना मुख्यमंत्र्यांनी उचलेले पाऊल मागील आठ वर्षांपासून सामाजिक कार्य करताना समाजाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवले. मुख्यमंत्री शिवसेनेचा असताना निधी अभावी विकास कामांना खिळ बसत होती. पर्यटनाला आदित्य साहेबांनी 15 कोटीचा निधी मंजूर केला मात्र त्यालाही खूप वेळ गेला होता. त्यालाही काही ज्येष्ठ मंत्र्यांनी खोडा घातल्याचा  आरोप भूजबळांचे नाव न घेता त्यांनी केला.


आमच्या दोन मागण्या मान्य झाल्या नाही!
आम्ही 16 खासदार जेव्हा उद्धव ठाकरेंकडे गेलो होतो तेव्हा आमच्या दोन मागण्या होत्या.. पहिली म्हणजे भाजप सोबत युती करा कारण महाविकास आघाडी सोबत खूप वाईट अनुभव आले आणि दुसरी म्हणजे संजय राऊत रोज सकाळी काही तरी बोलतात त्यामुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन होत असून त्यांना शांत करा, त्यांच्यामुळे महाविकास आघाडी झाली आणि आम्हाला त्रास होत गेला. 50 आमदार जेव्हा गेले तेव्हा त्यांच्यावरही आरोप केले राऊतांनी, ते कदाचित परत आले असते. पक्ष एक बाजूला आणि एक माणूस एका बाजूला. एका माणसामुळे त्रास होत असेल तर त्यांनी न बोललेच चांगले असे आम्ही म्हंटले होते.


पर्यटनाचा निधी काही आला नाही 
शिवसंवाद निमित्त आदित्य ठाकरे बोलले की अनेकांना निधी दिला. मात्र पर्यटनाचा निधी काही आला नाही, ते माझ्या प्रचाराला आले होते. त्यांचे आभार आहेत. आदित्य ठाकरे म्हणाले की,  हे सरकार कोसळेल पण दोन तृतीयांश संख्याबळ ज्यांच्याकडे असते ते कोसळत नाही. निश्चित हे सरकार टिकेल असा विश्वास हेमंत गोडसेंनी यावेळी व्यक्त केला.