Swatantryaveer Sawarkar Jayanti :  सशस्त्र क्रांतीचे पुरस्कर्ते आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिकमध्ये स्थापन केलेल्या अभिनव भारत ही संस्था ज्या वाड्यात आहे, त्याचा कायापालट होण्यास सुरवात झाली असून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अभिनव भारताच्या नूतनीकरणाला प्रारंभ होणार आहे. 


स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म नाशिकच्या भगुर येथे झाला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकचे भूषण आहे. जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे सावरकर स्वातंत्र्य योद्ध्यांची प्रेरणा होते. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. 'ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला' ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. या जयंतीच्या निमित्त्ताने सावरकरांनी सांगितलेले वचन. त्या वचनाचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. सावरकर म्हणाले होते होते कि, 'माझे स्मारक बंधू नका, त्याऐवजी 1857 च्या संग्रामातील क्रांतिवीरांना श्रद्धांजली अर्पण करा, 1857 ते 1947 या संग्रामात ज्या ज्ञात अज्ञात महापुरुषांनी योगदान दिले, त्यांच्या स्मृती जपा', असा सल्ला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिला. त्याचे तंतोतंत पालन करण्यात येत आहे. 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नाशिक जन्मभूमी. येथील क्रांतीची गतः सांगणारे अभिनव स्मारकाची वास्तू आजही इतिहासाच्या पानांनी धगधगत आहे. हि वास्तू म्हणजे एकप्रकारे सशस्त्र लढ्याचे केंद्रच होते. त्यामुळे सावरकरांच्या अनेक आठवणी अभिनव भारत सोबत जोडल्या आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर १९५२ मध्ये सावरकर यांनी अभिनव भारतसह अन्य तीन संस्था विसर्जित केल्या असल्या तरी नाशिकमध्ये तीळभांडेश्वर लेनमध्ये आजही अभिनव भारत मंदिर आहे. 


दरम्यान अभिनव भारत मधील स्मृती जपण्यासाठी येथील तुळशी वृंदावन, स्वातंत्र्य लक्ष्मीची मूर्ती, हुतात्म्यांच्या स्मृतीना उजाळा देण्यात येत आहे. त्याचबरोबर अभिनव भारतच्या खोल्यांना बाबाराव सावरकर, अनंत कान्हेरे, कर्वे, विनायक देशपांडे आदी स्वातंत्र्यवीरांचे नावे देण्यात आली आहेत. त्यामुळे अभिनव भारतला पुनः एकदा झळाळी मिळाली असून जणू काही नवचैतन्य पसरल्याचे चित्र दिसत आहे. 


लोकवर्गणीतून वाड्याचे जतन
नाशिकच्या तीळभांडेश्वर लेनमधील अभिनव भारत संस्थेचे कार्यालय असलेला हा वाडा आजही इतिहासाची साक्ष देतो. मात्र स्वातंत्र्यानंतर हा वाडा मिळवण्यासाठी अनेकांना भांडावे लागले. शेवटी लोक वर्गणी करून हा वाडा मिळवला. यासाठी शासनाकडून एक दमडी न घेता लोकांकडून पैसे घेऊन वाडा मिळवला होता. यामध्ये केतकर, दातार, महाबळ गुरूजी, वर्तक, भट यासारख्या धुरिणांनी निधी संकलन केले. तर स्वा. सावरकर यांनी ठिकठिकणी व्याख्याने दिली. त्यातून मिळालेला निधीही त्यांनी या वाड्याच्या खरेदीसाठी दिला, अशी माहिती अभिनव भारत समिती पदाधिकाऱ्यांनी दिली.