Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी (Indepedance Day) वर्षानिमित्त उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेतर्फे (Nashik ZP) जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये 25 जुलै ते 29 जुलै दरम्यान विशेष ग्रामसभांचे (Gramsabha) आयोजन करण्यात करण्यात येणार आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये हर घर तिरंगा, हर घर जल आणि प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये "घरोघरी तिरंगा" (Har Ghar Tiranga) हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
घरोघरी तिरंगा हा उत्सव प्रत्येक व्यक्तीचा, कुटुंबाचा असून या कालावधीमध्ये गावातील सर्व नागरिकांनी ग्रामपंचायत येथून तिरंगा ध्वज विकत घेवून आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा लावण्याचा उपक्रम यशस्वी करून अमृत महोत्सव हा साजरा करावा. त्याचबरोबर जल जीवन मिशन अभियानांतर्गत 100 टक्के नळ जोडणी झालेल्या गावांमध्ये संदर्भाधीन शासन परिपत्रकानुसार "हर घर जल" घोषित करण्याबाबत ग्रामसभेचा ठराव घेण्यात येणार आहे. तसेच लोकवर्गणी व पाणी पट्टी जमा करणेबाबत निर्धार करुन त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात यावी.
कोव्हिडचा प्रथम डोस (Covid vaccination) प्राप्त झालेल्या 12 वर्षांवरील बालकांना व नागरिकांना योग्य अंतराने कोव्हिड लसीचा व्दितीय डोस देणे आणि 18 वर्षांवरील नागरिकांना व्दितीय डोसनंतर 6 महिन्यांनी कोविड लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत आपल्या ग्रामपंचायतीजवळच्या शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर मोफत प्रतिबंधात्मक बुस्टर डोस घेण्याबाबत जनजागृतीसाठी करावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या निर्देशानुसार 25 जुलै ते 29 जुलै या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
"स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष ग्रामसभेमध्ये गावातील प्रत्येक नागरिकाने सहभाग घेऊन घरोघरी तिरंगा या उपक्रमासाठी आपले योगदान द्यावे, 12 ते 18 वयोगटातील बालकांनी व 18 वर्षावरील सर्व नागरिकांनी कोव्हीड प्रतिबंधात्मक लस घ्यावी त्याच बरोबर जल जीवन मिशन अंतर्गत 100 नळ जोडणी झालेल्या गावांमध्ये शासन परिपत्रकानुसार 'हर घर जल' घोषित करण्याबाबत ठराव घ्यावा, अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य सीईओ लीना बनसोड यांनी दिली आहे.
दोन लाख तिरंगा झेंडे
देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे अझाद का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा प्रत्येक घरावर फडकवण्यात येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सूचना देखील केल्या असून नाशिक शहरात दोन लाख घरांवर तिरंगा झेंडा लावण्यात येणार आहे. यासाठी नाशिक महापालिका दोन लाख झेंडे खरेदी करून नागरिकांना वाटप करणार आहे.