नाशिक : तुम्ही सोडून गेलात, आमच्या मनात काहीही नाही, मात्र थोडी जरी लाज उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, आणि निवडणुकांना समोरे जा असे आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.
शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी शहरातील मनोहर गार्डन येथे कार्यकर्त्यांनी संवाद साधला यावेळी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील नंतरच्या काळात राजीनामे दिले. यामुळे शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे शिवसंवादच्या माध्यमातून राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे.
आज सायंकाळी ते नाशिक मध्ये दाखल झाले त्यानंतर त्यांनी मनोहर गार्डन येथे कार्यकर्त्यांनी संवाद साधतात यावेळी ते म्हणाले, चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं, राज्यात झालेल्या राजकीय नाट्याचे तुम्ही सर्वच साक्षीदार आहात, हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का? असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केला. यावर सभागृहात 'नाही' असा जोरदार प्रतिसाद यावेळी मिळाला.
चाळीस लोकांनी खंजीर खुपसला..
ते पुढे म्हणाले, कधी काळी याच चाळीस लोकांवर अतोनात प्रेम केलं, जीवापाड जपलं, दु: ख एकाच गोष्टींच आहे, एवढं प्रेम करून, एवढा विश्वास ठेवून, आपण प्रेमाने मिठी मारून, आज याच 40 लोकांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. आपली प्रेमाची विश्वासाची मिठी होती, मात्र आम्ही पाहिलच नाही की त्यांच्या हातात खंजीर होता...तो खंजीर तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीत खुपसला
नाशिकच्या खासदारासाठी धो धो पावसात फिरलो...
नाशिकच्या खासदारासाठी दिवस रात्र एक केली, धो धो पावसात फिरलो, गगल्लोगल्लीत प्रचार केला, आज त्यांनीच विश्वासघात केला आहे. मी पर्यावरण मंत्री असताना मी डोळे बंद करून येतील खासदारांना निधी दिली दिला. विश्वास ठेवून निधी दिला. कधीच नाही म्हटलो नाही, आणि त्याच माणसांनी गद्दारी केली.
एवढीच चूक केली, अतिविश्वास दाखवला...
ज्यांनी तुम्हाला घडवलं, शिवसेना ही ओळख दिली, त्यांच्याच पुत्राला मुख्यमंत्री पदावरून हटवले, आता आमच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत देखील त्यांच्यात उरली नाही. दुःख याच गोष्टीच वाटतंय आपल्याच लोकांनी गद्दारी का केली, आपल्याच लोकांनी का धोका दिला. आपल्या राज्याला माणुसकीची गरज आहे, आपल्याला सत्तेची नाही तर सत्याची गरज आहे.