Nashik News : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या (Swatantrya Amrut Mahotsav) निमित्ताने हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) उपक्रमांतर्गत नाशिक महापालिकेला (Nashik NMC) प्राप्त झालेल्या दोन लाख राष्ट्रध्वजांपैकी तब्बल सव्वा लाख ध्वज सदोष आढळले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे सदस्य राष्ट्रध्वजांची विक्री थांबवण्यात आली असून सदोष सव्वा लाख ध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाला (Collector Office) परत केले आहेत. 

देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम साजरे करण्यात येत आहेत. अशातच देशभरात घराघरात तिरंगा फडविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोटी जनता तिरंगा खरेदी करत आहे. नाशिकध्ये देखील २ लाखाहून अधिक राष्ट्रध्वज मागविण्यात आले होते. त्यानुसार हजारो नागरिकांनी ते खरेदी देखील केले होते. मात्र यातील काही राष्ट्रध्वज सदोष आढळले आहेत. खाजगी आस्थापनांकडून नव्याने एक लाख राष्ट्रध्वज खरेदी करण्यात आल्याची माहिती उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली. नाशिक महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडावर यांनी सदोष ध्वजांची विक्री न करण्याची आवाहन केले असून सदोष विक्री केल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नाशिक महापालिकेला दोन लाख राष्ट्रध्वजांच्या वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दोन लाख ध्वज प्राप्त झाले असून मुख्यालयासह सहा विभागीय कार्यालयांमध्ये त्याच्या वितरण केले जात आहे. एक ध्वज वीस रुपयांना दिला जात आहे. गेल्या आठ दिवसात जवळपास 48 हजार नागरिकांनी ध्वज खरेदी केले. मात्र तब्बल सव्वा लाख ध्वज सदोष असल्याचे समोर आले आहे. हे ध्वजवंदन करणे योग्य नाही तसेच ध्वजामध्ये तिन्ही रंगाचा आकार एक समान नाही. तसेच ध्वजाचे कापड निकृष्ट दर्जेचे आहे. ध्वजाचे लांबी रुंदी मध्ये अनियमित्त असल्याच्या तक्रारी असल्याने महापालिकेने सदोष ध्वजांचे वितरण थांबवले आहे. 

एक लाख ध्वज परत केले 
ध्वज कमी पडू नयेत यासाठी खाजगी असताना कडून नव्याने एक लाख ध्वज खरेदी करण्यात आले असून ते आता पालिकेच्या कार्यालयाकडून वितरित केले जाणार आहे तर कारवाईचा इशारा नाशिक महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात सदोष विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्याने त्या पार्श्वभूमीवर सदोष ध्वजांचे वितरण करणे अशा सूचना देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त डॉक्टर फुलकुंडवार यांनीही महापालिका मुख्यालय मुख्यालयासह विभागीय अधिकाऱ्यांना सदोष वितरण करण्याचा सूचना दिल्या आहेत तसे झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.

सव्वा लाख ध्वज सदोष 