Ashahdhi Ekadashi : रविवारी होत असलेल्या आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भाविक, पालख्या आणि वारकऱ्यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरामधून सवलत देण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे पास नाशिक  (Nashik) आयुक्तालयाच्या हद्दीतील पोलीस ठाण्यातून घेऊन जाण्याचे आवाहन पोलीस  प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रिकानुसार दि. 07 जुलै ते 15 जुलै या कालावधीमध्ये पंढरपूर येथे जाताना व येताना भाविक व वारकऱ्यांच्या जड आणि हलक्या वाहनांसाठी पथकरांतून सवलत देण्यात आलेली आहे. पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी हलक्या व जड वाहनांनी जाणाऱ्या भाविकांनी त्यांच्या वाहनांसाठी पासेस उपलब्ध करून घ्यावेत. याकरिता नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील 13 पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून पास वितरित केले जात आहे. 


आगामी सन 2022 च्या आषाढी वारीसाठी पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकांच्या व वारकऱ्यांसाठीच्या वाहनांना टोलमधून सूट देणे तसेच रस्ते दुरुस्तीबाबत या विषयाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या भाविक व वारकऱ्यांना आषाढी एकादशी 2022 गाडी क्रमांक चालकाचे नावाचा मजकूर नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस, संबंधित आरटीओ यांनी नमूद करून आवश्यक त्या संख्येनुसार स्टिकर्स परिवहन विभाग वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ ऑफिस मध्ये सात जुलै पासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


तसेच पंढरपूरला जातेवेळी व येतेवेळी म्हणजेच सात जुलै ते 15 जुलै या कालावधीत ही सवलत पालख्या व वारकऱ्यांच्या भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या व जड व वाहनांसाठीच असेल अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तसेच स्टीकर्स पास वर नमूद करण्यात यावे, सदरचे पाच पथकर सवलतीसाठी ग्राह्य धरण्यात येतील. याप्रमाणे स्टिकर्स तयार करण्यात यावेत ग्रामीण व शहरी पोलीस प्रादेशिक परिवहन यांच्यामार्फत दिले जाणारे खूपच यांची संख्या एकत्रित माहिती दरम्यान नाशिक शहरातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोल माफीसाठी संबंधित पास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


परिमंडळ-1चे पोलीस उपआयुक्त अमोल तांबे म्हणाले कि, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील 13 पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सदरचे पास वितरित केले जात आहेत. तरी संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे भावीक आणि वारकऱ्यांनी ते राहत असणाऱ्या पोलीस स्टेशन येथे जाऊन त्यांच्या वाहनांसाठी पास उपलब्ध करून घ्यावेत. अशी विनंती या संदेशाद्वारे करण्यात येत आहे.