Nashik News : नाशिकच्या (Nashik) इंदिरानगर (Indiaranagar) येथील बांधकाम व्यवसाय कौस्तुभ हुदलीकर (Kaustubh Hudlikar) हे हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) स्पीटी जिल्ह्यात ट्रेकिंग साठी (trekking) गेले असता  श्वास घेण्यास त्रास होऊन उपचार दरम्यान हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्याने मृत्यू झाला. या घटनेने बांधकाम व्यावसायिक संतोष हुदलीकर यांच्या कुटुंबाला धक्का बसला असून त्यांच्या एकुलता एक मुलाचा निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळच्या सुमारास कौस्तुभ यांच्या पार्थिवावर इंदिरानगर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. 


इंदिरानगर येथील मोतकेश्वर सोसायटीत राहणारे संतोष हुदलीकर यांचा मुलगा कौस्तुभ हा नाशकातीलच दोघा मित्रांसमवेत 21 ऑगस्ट पासून पर्यटनासाठी हिमाचल प्रदेशात गेला होता. कौस्तुभसह त्याच्या मित्रांना डोंगरावर चढाई करण्याची आवड असल्याने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या होत्या. त्यातच गुरुवारी कौस्तुभ हा मित्रांसमवेत स्पिटी जिल्ह्यातील काजा डोंगरावर चढाई करण्यासाठी गेला होता. दुपारी अडीच वाजता सुमारास साधारण दोन हजार फूट उंचीवर गेल्यावर त्या श्वास घ्यायला त्रास होऊ लागला होता. 


दरम्यान या सर्वांनी चढाई तर केली, मात्र तिथून खाली उतरत असतानाच कौस्तुभ कोसळला. त्याच्या सोबतच्या मित्रांनी व स्थानिक ट्रेकर्सनी त्याला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती. शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेने बांधकाम व्यावसायिक संतोष हुदलीकर यांच्या कुटुंबाला धक्का बसला असून त्यांच्या एकुलता एक मुलाचा निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. आज सकाळच्या सुमारास कौस्तुभ यांच्या पार्थिवावर इंदिरानगर परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.


हुदलीकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर 
बांधकाम व्यवसायिक कवी, लेखक, सावानाचे सदस्य संतोष हुदलीकर यांचा कौस्तुभ हा एकुलता एक मुलगा होता. त्याने वडिलांच्या व्यवसायात मदत करीत स्वतःची ओळख निर्माण करीत वेगवेगळे बांधकाम प्रकल्प हाती घेतले होते. दोन वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगा देखील आहे. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी मुलगा बहीण असा परिवार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतराव खुदलीकर यांचा तो नातू होता. हुदलीकर यांच्या घरात कुटुंबीयांच्या आक्रोश बघून परिसरावर देखील शोककळा पसरली होती. 


दोन हजार उंचीवर ट्रेकिंग 
बांधकाम व्यवसायिक असलेले कौस्तुभ दोन मित्रांसमोर समुद्रसपाटीपासून दोन हजार फूट उंचीवर असलेल्या काजा या शहरातील एका डोंगरावर ट्रेकिंग साठी गेले होते. दुपारच्या सुमारास खाली उतरत असताना कौस्तुभला ऑक्सीजनची कमतरता जाणवू लागली. यावेळी त्यांनी काही ट्रेकर्स आणि मित्रांच्या मदतीने मनाली येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बरेही वाटले. यावेळी त्यांचे व मित्रांचे बोलणेही झाले. मात्र काही वेळाने पुन्हा त्रास जाणवु लागला आणि यानंतर पुन्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्यांचे निधन झाले.