Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील अनेक मध्यम धरणे (District Dams) शंभर टक्के भरले असून धरणांमधील एकूण सरासरी जलसाठा 92 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर गंगापूर धरण (Gangapur Dam) 94 टक्के भरल्यामुळे मंगळवार दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर बुधवारी सकाळी 3000 क्यूसेकने विसर्ग वाढवण्यात आल्याने गोदावरीच्या (Godavari) पाणी पातळीत वाढ झाली आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात पावसाची संततधार सुरूच असून गंगापूर पाणलोट क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे यामुळे गंगापूर धरण संवाद झपाट्याने वाढ झाली आहे त्याचबरोबर गंगापूर धरणातही पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे काल दुपारपासूनच गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात येत आहे आज सकाळी 3621 ने हा विसर्ग वाढवण्यात आला होता तर गंगापूर धरण क्षमतेचा 94 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील विविध धरण समूहाचा आजचा धरण साठा पाहिला असता मंगळवार अखेर गंगापूर धरण क्षमतेच्या 94 टक्के भरले असून आज सकाळपासून 3600 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील इतर धरणांपैकी कश्यपी आणि गौतमी गोदावरी दोन्ही धरणे 99 टक्के भरले असून त्यातून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरण समूहातील धरणांचा जलसाठा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर पालखेड धरण समूहापैकी पालखेड धरण 66 टक्के, करंजवण 82 टक्के, वाघाड 100 टक्के भरले आहे. ओझरखेड धरण 100 टक्के पुणेगाव प्रकल्प 90 टक्के तिसगाव धरण 100 टक्के भरले असून पालखेड धरण समूहाचा साठा देखील 98 टक्क्यांवर पोहोचला आहे. एकूणच जिल्ह्यातील एक सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली असून नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या धरणात मात्र फक्त 38 टक्के जलसाठा आहे. तसेच इतर धरणातून वेळोवेळी गरजेनुसार जादा पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर नांदूरमेश्वर धरणातून सर्वाधिक 39 हजार 172 क्यूसेकने पाणी गोदावरी सोडण्यात आले आहे.
असा आहे धरणसाठा
दारणा धरण समूहापैकी दारणा 96 टक्के भावली 100, मुकणे 98, वालदेवी 100, कडवा 89 भोजपूर 100 टक्के भरले असून गिरणा खोरे धरण समूहात चणकापूर 73 टक्के, हरणबारी 100 टक्के, केळझर 100 टक्के, गिरणा धरण 92 टक्के भरले असून गिरणा धरणातून देखील दोन दिवसांपासून विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पुनद प्रकल्प 76 टक्के, माणिकपुंज धरणात 71 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.