Nashik NMC Teachers : एकीकडे शिक्षकांच्या (Teachers) मुख्यालयी राहण्याबाबतचा मुद्दा चांगलाच गाजवीत असता नाशिकच्या (Nashik) मनपा शिक्षकांबाबत (NMC Teachers) महत्वाची माहिती समोर येत आहे. नाशिक महानगरपालिकाच्या शिक्षकांना मागील 3 महिन्यापासून वेतन नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांकडून (Teachers Protest) आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक मनपाच्या (Nashik NMC) शहर परिसरात सातशेहून अधिक शाळा आहेत. कोरोना काळात (Corona) ऑनलाईन शिकवणी बंद झाल्याने सध्या सर्व शाळा सुरळीत सुरु आहेत. असे असताना मात्र येथील शिक्षकांना तब्बल तीन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिकेच्या शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानासाठीचा शासन हिस्सा लालफितीच्या फाइलमध्ये अडकल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. ही आर्थिक घुसमट सहन करण्याच्या पलिकडे गेल्याने शिक्षक संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान शासनाकडून अनुदान मिळत नसल्याने 950 हुन अधिक प्राथमिक शिक्षकाचे वेतन रखडले असल्याचे समोर आले आहे. यामध्ये मनपा शिक्षकांना 50 टक्के मनपा, 50 टक्के शासनाकडून अनुदान दिले जाते. यात सध्या मनपाचे देयक तयार आहे मात्र शासनाकडून अनुदान नसल्याने वेतन रखडले आहे. या पार्श्वभूमीवर मनपा शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून येत्या १२ सप्टेंबर ला शिक्षण उपसंचालक कार्यलयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात मनपा शिक्षकांसह निवृत्ती वेतन थकलेले निवृत्त शिक्षक ही आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मनपा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यातही निवेदन
दरम्यान शिक्षक संघटनकडून यापूर्वी देखील निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांची भेट घेत वेतन अनुदानाचा शासन हिस्सा न मिळाल्याने शिक्षकांचे वेतन रखडल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या बैठकीत समाधानकारक माहिती न मिळाल्याने समितीने 02 सप्टेंबरचा अल्टिमेटम शिक्षण विभागाला दिला होता, मात्र त्यानंतर देखील काही साध्य झाले नसल्याचे समोर आले. त्यामुळे आता येत्या 12 सप्टेंबरला शिक्षण उपसंचालक कार्यलयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करणार आहेत.
शाळा डिजिटल करण्यावर भर
एकीकडे मनपा शिक्षकांना वेतन मिळत नसल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे मनपाच्या शाळा डिजिटल करण्यावर भर दिला जात आहे. सोयीसुविधांनी युक्त शाळा विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लावेल, त्यातून गळती थांबण्यास मदत होईल. या दृष्टीने यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. असे असताना याच शाळातील शिक्षकांना मागील तीन महिन्यापासून पगार नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याकडे शासनांसह संबंधित प्रशासनने लक्ष देणे आवश्यक असल्याचे दिसते.