Palghar News : पालघरची (Palghar) घटना अत्यंत दुर्दैवी असून यावर तातडीने उपाययोजना म्हणून येत्या दोन वर्षात राज्यातील 100 लोकसंख्या असलेल्या खेड्यपाड्यापर्यंत रस्ते तयार करणार आहोत, शंभर पॉप्युलेशनपर्यंत रस्ते उपलब्ध झाले तर अनेक अडचणी सुटतील, जोपर्यंत दळणवळण दिले जात नाही, तोपर्यंत दुर्गम भागातील नागरिकांचा विकास शक्य नाही, असे मत आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (Minister Vijaykumar Gavit) यांनी व्यक्त केले.
दरम्यान पालघर जिल्ह्यातील मोखाडा (Mokhada) परिसरात गर्भवतीला वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा (Twins) मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागातील अशा गैरसोयीच्या अनेक मागील काही दिवसांत समोर आल्या आहेत. नुकतेच आदिवासी विकास मंत्रीपदी विराजमान झालेले विजयकुमार गावित हे नाशिकमध्ये होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, पालघरची घटना अत्यंत दुर्दैवी असून यासाठी लवकरच ठोस उपाययोजना हाती घेणार आहोत.
ते पुढे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासूनचा दुर्गम भागातील हा प्रश्न असून तो सोडविण्याचा प्रयत्न करतो आहोत. मागच्या दोन-तीन वर्षापासून आम्ही दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे म्हणून आम्ही खासदार हिना गावित यांच्या माध्यमातून केंद्राशी चर्चा करत आहोत. केंद्राने पीएम योजनेच्या माध्यमातून 250 लोकसंख्या असलेल्या खेड्यांपर्यंत रस्ते जोडीला निधी देत आहे. उत्तर महाराष्ट्रात 100 लोकसंख्या असलेल्या वाड्यांना निधी दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर हि योजना राज्य शासनांच्या माध्यमातून राज्यातील 100 लोकसंख्या असलेल्या वाड्या वस्तींमध्ये रस्ते तयार करण्याचा मानस आहे.
राज्यातील दुर्गम आदिवासी भागात दळणवळणाच्या सुविधा झाल्यास अनेक प्रश्न सुटतील. यामध्ये महिला बालकल्यांणचे प्रश्न असतील, रोजगाराचे प्रश्न असतील ते सुटायला मदत होईल. त्यामुळे लवकरच पुढच्या काळामध्ये राज्य शासनाकडून 100 लोकसंख्या असलेल्या ठिकाणी रस्ते उपलब्ध करून देणार असू, त्यामुळे निश्चितच आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
Palghar Medical Health issue : आरोग्य सेवेअभावी जुळ्या बालकांचा मृत्यू ABP Majha
कनेक्टिव्हिटी नसल्याने राज्यातील आदिवासी बांधव विकासापासून वंचित असून त्यातीलच कुपोषण हि सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी सरकार आदिवासींच्या कनेक्टिव्हिटीवर काम करणार असून या माध्यमातून आदिवासींच्या विसला निश्चितच चालना मिळेल अशी अशा नाव नियुक्त कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केली आहे.
शिंदे सरकारच्या मंत्री मंडळात डॉ. विजयकुमार गावित यांचा समावेश करण्यात आला असून त्यांनी नुकतीच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. सध्या गावित हे नाशिकमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी उपस्थित असताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील आदिवासी हा वंचित राहिला असून पायाभूत सुविधा देखील आदिवासींना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी आदिवासी प्रथमता दळणवळणाच्या सोयी करून देणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयी झाल्यास त्यांचा शहराशी, तालुक्याशी संपर्क राहील. त्यांना रोजगार मिळेल आणि या माध्यमातून आपोआप आदिवासी बांधव विकसित होतील, अशा आशावाद यावेळी त्यावेळी त्यांनी व्यक्त केला.
अनेक वर्षापासून आदिवासी वंचित
गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील आदिवासी हा वंचित राहिला असून पायाभूत सुविधा देखील आदिवासींना मिळत नसल्याचे दिसून येत आहे. यासाठी आदिवासी प्रथमता दळणवळणाच्या सोयी करून देणे आवश्यक आहे. दळणवळणाच्या सोयी झाल्यास त्यांचा शहराशी, तालुक्याशी संपर्क राहील. त्यांना रोजगार मिळेल आणि या माध्यमातून आपोआप आदिवासी विकसित होण्यावर भर मिळेल. मुख्य प्रवाहामध्ये यायला अडचण होणार नाही. कनेक्टिव्हिटी नसल्याने आरोग्य सुविधा नाही, रस्ते सुविधा नाही, वाहतुकीच्या सुविधा नाही. त्यामुळे आदिवासी विकासापासून वंचित वर्षापासून या अडचणी असून त्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यावर भर असेल.