World Trible Day : आज सगळीकडे जागतिक आदिवासी दिवस (World Trible Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. नाशिकमध्ये (Nashik) देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वाटवरणात साजरा होताना पाहायला मिळत आहे. नाशिक(Nashik), सुरगाणा (Surgana), पेठ (Peth), हरसूल, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी भागासह शहरातील विविध भागात वाजत गाजत आदिवासी बांधवांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 


आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचे संरक्षण व्हावे, संस्कृतीचे रक्षण करणे, त्यांचा जल-जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता, कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन  संयुक्त राष्ट्र संघाकडून हा दिवस दरवर्षी 'जागतिक आदिवासी दिन' म्हणून साजरा केला जातो.


आज जागतिक आदिवासी दिन नाशिकमध्ये देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वाटवरणात साजरा होताना पाहायला मिळत आहे.नाशिकच्या पंचवटी कारंजा ते गोल्फ क्लब मैदान पर्यंत आज वाजत गाजत आदिवासी बांधवांकडून रॅली काढण्यात आली होती.या रॅलीमध्ये आदिवासी बांधवांकडून त्यांची पारंपरीक वेशभूषा धारण करून पारंपरीक वाद्यावर नृत्य साजरे करण्यात आले होते, तर दुसरीकडे ढोल ताश्यांच्या गजरात नाचत गाजत आदिवासी दिनानिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी चौका चौकात असलेल्या महापुरूषांच्या पुतळ्यांना आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन देखील करण्यात आले...पंचवटी कारंजा पासून निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येने आदिवासी बांधव बघिणी आणि तरुणाई ही सहभागी झाली होती तर एकाच जल्लोष आणि उत्साह हा या रॅलीत पहालायला मिळाला आहे. 


दरम्यान 21 व्या शतकातही जगातील विविध भागांत राहणारा आदिवासी समाज आजही बेरोजगारी, बाळ मजूरी, भेदभाव, उपेक्षा, स्थलांतर, अन्न, वस्त्र, निवारा, गरीबी, निरक्षरता, आरोग्य सुविधा, शैक्षणिक सुविधा, मोल मजुरी, सामाजिक विकास, आर्थिक प्रश्न, शैक्षणिक मागासलेपणा अशा प्रकारच्या समस्यांना सामोरा जात आहे. त्यामुळे जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना आदिवासी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांचा उहापोह होणे गरजचे आहे. त्याचबरोबर त्यांच्यापर्यंत पायाभूत सुविधा पोहचणे आवश्यक असल्याचे या निमित्ताने समोर येते. 


मुख्य प्रवाहाकडे आदिवासींची वाटचाल
जंगलात राहणारा वस्त्रशून्य किंवा अर्धवस्त्र समाज म्हणजे आदिवासी समाज अशी एकेकाळी आदिवासी समाजाची ओळख होती. मात्र. आता आदिवसींनीही आपली वाट बदलून मुख्य प्रवाहाची वाट धरली आहे. या समाजातून शिक्षित आणि स्पर्धा परीक्षांमध्ये नैपूण्य दाखविणाऱ्यांचा टक्कादेखील वाढला आहे. वर्तमानातून उज्ज्वल भविष्याकडे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात जाताना आपल्या गौरवशाली परंपरांचे जतन करणारा आदिवासी समाज अशी एक नवी ओळख निर्माण झालेली आहे.