Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील जेलरोड भागातील महिलेच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता सातपूर भागात परप्रांतीय महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही महिला तीन दिवसांपूर्वीच सातपूरच्या विधाते भागात भाडेकरू म्हणून वास्तव्यास आली होती. अचानक झालेल्या घटनेने परिसर हादरला असून या प्रकरणी सातपूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


नाशिक शहरात सातत्याने खुनाच्या घटनांसह (Crime rate) गुन्हेगारीचा आलेख चढताच आहे. रोजच होणाऱ्या घटनांनी शहर हादरत असून सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणे देखील मुश्किल झाले आहे. अशातच सातपूर भागात धक्कादायक घटना समोर आली असून गल्लीत तीन दिवसांपासून भाडेकरू म्हणून राहणाऱ्या महिलेची अज्ञात व्यक्तीने गळा चिरून निर्घृण हत्या (Women Murder) केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली. या प्रकरणात असून मृत महिलेच्या मारेकऱ्यांचा शोध घेत पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


मध्यप्रदेशातील रहिवासी असलेले शनिदयाल बैस हे पत्नी अशोक्तीबाई यांच्यासोबत तीन दिवसांपूर्वीच सातपूरच्या विधाते गल्लीत भाडेकरू म्हणून राहायला आले आहेत. सोमवारी पहाटे अशोक्तीबाई हिने पती शनिदयाल यास कामावर जाण्यासाठी डबा तयार करून दिला. त्यानंतर पती शनिदयाल बैस कामावर गेल्यानंतर काही वेळातच त्यांच्या दहा वर्षांच्या मुलीला तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने घर मालकास सांगितले. घरमालकाने ही घटना तात्काळ शनिदयाल यांना कळवली. शनिदयालने पुन्हा घराकडे धाव घेत पोलिसांना (Satpur Police) या घटनेची माहिती दिली. सातपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा केला. दरम्यान, मृत अशोक्तीबाई हिच्या पश्चात एक मुलगी असून पती शनिदयाल बैस हा एका खासगी कंपनीत कामाला आहेत.


काही परप्रांतीय संशयित ताब्यात 


दरम्यान, या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सातपूरमध्ये महिलेची गळा चिरून हत्या झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी घटनास्थळी दाखल होत पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले. यावेळी पोलीस आयुक्त शेखर देशमुख हेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनीही पोलिसांना तपासाच्या दृष्टीने सूचना करून संशयितांना तात्काळ ताब्यात घेण्यास सांगितले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शनिदयाल बैस यांचे कुटुंबीय काही दिवसांपूर्वीच सातपूरच्या विधाते गल्लीत राहायला आलेले आहेत. त्यानंतर लागलीच त्यांच्या पत्नीचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये मध्यप्रदेशातील तरुणाचा समावेश असल्याची माहिती आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Nashik Crime : 'ती' रेल्वेस्थानकांवर एकटीच, पाणी विक्रेत्याने तिला वडापाव दिला अन् त्यांनतर तरुणीसोबत भयंकर घडलं?