Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मागील 24 तासांत गुन्ह्यांची (Crime) मालिकाच घडली असून दिवसेंदिवस जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावत चालल्याचे हे उदाहरण आहे. पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) शहराजवळील शिरवाडे वणी येथे पत्नीचा खून (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्यांत मागील 24 तासांत अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली. मागील काही महिन्यातील गुन्हेगारीचा उच्चांक म्हणावा लागेल. अशातच जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील शिरवाडे वणी गावात पती पत्नीच्या वादातून पत्नीचा तिच्या माहेरीच खून केल्याची घटना घडली आहे. 


दिंडोरी तालुक्यातील एकलहरे येथील जान्हवी महाले ही निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथील माहेरी आपल्या पतीसोबत आली होती. यावेळी पती पत्नीत किरको वाद झाला. किरकोळ वाद असताना वाढत जाऊन पतीचा राग अनावर झाला. त्या वादाचे रूपांतर जोरदार भांडणात झाल्याने पती नामदेव उत्तम महाले याने लाकडी दांड्याने जान्हवीच्या डोक्यात डोक्यात वार केले. या हल्ल्यात जान्हवी गंभीर जखमी झाली.
 
दरम्यान जान्हवी गंभीर जखमी झाल्याने अधिक रक्तश्राव झाला. यामुळे काही वेळातच तिचा मृत्यू झाला. तर पतीने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान घटनेनची माहिती मिळताच पिंपळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर अशोक वाघ यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे करत आहेत.


नाशिकला झालंय काय? 
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीने कळस गाठला असून दिवसाढवळ्या हाणामारीच्या, दोन गटात वाद हे तर नित्याच्या झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक पोलीस प्रशासन नेमकं काय करतंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली असून काल दिवसभरात खून, चोरी, लुटमार आदी घटना उघडकीस आल्या आहेत. खरं तर धार्मिक नगरी सोबतच कुंभनगरी म्हणून नाशिकची ओळख.. मात्र याचाच फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. चक्क नागासाधूच्या रूपात आलेल्या चोरांनी दोन वयस्कर नागरिकांच्या सोनसाखळी लंपास केल्या असून चोरटे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत विशेष म्हणजे चोरांनी संमोहन केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. नाशिक मधील गुन्हेगारीवर आळा बसणार तरी कशी असाच प्रश्न आता उपस्थित होतोय.