Nashik Water Supply : नाशिककरांना (Nashik) पुन्हा एकदा आज पाणीबाणीला सामोरे जावे लागणार असून शहरातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून सातपूर (Satpur), नाशिक पश्चिम विभागातील जलकुंभ भरणाऱ्या वाहिनीला महिंद्रा कंपनीच्या (Mahindra Company) प्रवेशद्वाराजवळ भिंतीलागत गळती सुरू झाली आहे. यामुळे वाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवारी तातडीने हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी आज सातपूर, नाशिक पश्चिम मधील काही प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही, तर बुधवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती नाशिक मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.


दरम्यान दीड महिन्यांपूर्वी सातपूर परिसरात नाशिकला पाणीपुरवठा (Water Supply) करणारे पाईपलाईन फुटल्याने तर दोन ते तीन दिवस नाशिककरांना पाण्यासाठी वन वन करावी लागत होती. जलवाहिनीच्या गळती व दुरुस्ती कामामुळे याच विभागात अनेक दिवस टंचाईला तोंड द्यावे लागले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापासून सातपूर, अशोक नगर, नाशिक पश्चिम विभागातील जलकुंभ भरणारी ही 1200 मिलिमीटर व्यासाची सिमेंटची मुख्य जलवाहिनी आहे. महिंद्रा कंपनीच्या संरक्षक भिंतीजवळ जलवाहिनीला गळती सुरू झाली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून गळती थांबवण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने करणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.


दरम्यान आज दिवसभर हे काम केले जाणार असल्याने जलकुंभ भरता येणार नाही. त्यामुळे सातपूर विभागातील जुना प्रभाग क्रमांक आठ आणि दहा चा पूर्ण परिसर, प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्ध नगर परिसर, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सात मधील गंगापूर रस्त्यावरील माणिक नगर, श्रमिक कॉलनी, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी, सहदेव नगर, सुयोजित गार्डन, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्य नगर, आयाचित नगर, निर्मला कॉन्व्हेंट शाळा आदी परिसरात मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे बुधवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.


या भागात पाणी पुरवठा बंद 
सातपूर विभागातील जुना प्रभाग क्रमांक आठ आणि दहा चा पूर्ण परिसर, प्रभाग क्रमांक 11 मधील प्रबुद्ध नगर परिसर, नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सात मधील गंगापूर रस्त्यावरील माणिक नगर, श्रमिक कॉलनी, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन परिसर, विनय कॉलनी, सहदेव नगर, सुयोजित गार्डन, दादाजी कोंडदेव नगर, शांतिनिकेतन सोसायटी, चैतन्य नगर, आयाचित नगर, निर्मला कॉन्व्हेंट शाळा आदी परिसरात मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे बुधवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल नागरिकांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. दरम्यान दीड महिन्यांपूर्वी त्र्यंबक रस्त्यावरील सिमेंटच्या मुख्य जलवाहिनीला अशीच गळती लागली होती तिची दुरुस्ती करताना यंत्रणेची दमछाक झाली होती. अनेक दिवस सातपूर पश्चिम विभागातील अनेक भागांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले होते. त्यामुळे जलवाहिनीची गळती दुरुस्तीचा सामान्यांनी चांगला धसका घेतला आहे.