Sant Nivruttinath Palkhi : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथून आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे टँकर पुरवण्यात येणार असून पायी वारीत सहभागी झालेल्या हजारो वारकरी बांधवांना त्र्यंबकेश्वरपासून पंढरपूर (Pandharpur) पर्यंत शुद्ध पाणीपुरवठा (Water Supply) होणार आहे. त्याचबरोबर मोबाईल टॉयलेटची सुविधा देखील करण्यात आली असून हे टॉयलेट्स देखील पंढरपूरपर्यंत उपलब्ध असणार असल्याची माहिती 


पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आज लागून असलेल्या वारकरी बांधव आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यातून विठुरायाच्या दर्शनासाठी जात आहे. आज दुपारी दोन वाजता या पालखी सोहळ्याचा प्रस्थान होत आहे. या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी वारकरी आतुरले आहेत. आजपासून जवळपास 28 जून पर्यंत 450 किलोमीटरच्या अंतर कापून हे वारकरी पंढरपुरात पोहोचतील. या वारीत 42 दिंड्यांमधून दोन लाख वारकरी बांधव सहभागी होतील असा अंदाज आहे. तर त्र्यंबकेश्वर येथून निघणाऱ्या पायी वारी (Payi Dindi Palkhi) पालखीत जवळपास 25000 हून अधिक वारकरी सहभागी होतील, असं त्र्यंबक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात आलं आहे.


याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना दिंडी मार्गात मुबलक पाणी मिळावं यासाठी जिल्हा प्रशासन पाच टँकरची सेवा उपलब्ध करुन देत आहे. त्र्यंबकेश्वर येथून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यापर्यंत नाशिक प्रशासनाद्वारे तर तिथून पुढे सोलापूर जिल्ह्यापर्यंत नगर जिल्हा प्रशासनाने वारकरी बांधवांना पाणी स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सुविधा पुरवणे अपेक्षित आहे. परंतु गरज भासल्यास नाशिकहून ते पंढरपूरपर्यंत टँकर उपलब्ध करुन देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने ठेवल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली. तर या पालखी सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पुरवला जातो. त्यासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून चार लाख रुपयांची तरतूद केली आहे. 


12 मोबाईल टॉयलेट्स 


दरम्यान आषाढी वारीचा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पर्यंतचा प्रवासापर्यंत 25 दिवसांचा असणार आहे. निर्मल वारीची संकल्पना यशस्वी व्हावी, यासाठी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मात्र अद्याप याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचे समजते आहे. पालखी सोहळ्यासाठी 500 मोबाईल टॉयलेट्सवर अद्याप निर्णय होत नसल्याने संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश देत शक्य तितक्या सुविधा वाढीसाठी पुरवण्याचे सूचना दिल्याची माहिती संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाच टँकर्स पंढरपूरपर्यंत पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय 12 फिरते टॉयलेट्सदेखील पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आता निर्मलवारी होणार आहे. यासाठी यंदा प्रथमच 30 लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिला आहे.


आज होणार दिंडी मार्गस्थ 


पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागलेली असून वारकऱ्यांची पाऊले आज पंढरीच्या दिशेने चालू लागणार आहेत. श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चांदीचा रथ पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे. नाशिक जिल्ह्यातून 25 हजार वारकरी या दिंडीत सामील होतील असा अंदाज आहे. यावर्षी एक दिवस अगोदर पालखी पंढरपूरला रवाना होणार असून पालखीचा पहिला मुक्काम त्र्यंबकेश्वर शहरांतील श्री पंचायती महानिर्वाणी आखाड्यात होणार आहे. या महानिर्वाणी आखाड्यात गुरु  गहिनीनाथांची समाधी असल्याने इथे पहिला मुक्काम होणार आहे.