Trimabakeshwer Saptshrungi : देशभरात पुनः एकदा कोरोनाने (Corona) डोके वर काढल्यानंतर राज्य शासनाने (State Government) सतर्कतेचा सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्वाची मंदिर प्रशासनाकडून मास्क सक्ती केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimabakeshwer) मंदिरासह वणीचे सप्तशृंगी (Saptshrungi Gad) गडावर भाविकांना मास्क (Mask) बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


कोरोनाच्या नव्या लाटेने पुन्हा प्रशासनासह नागरिकांची डोकेदुखी वाढवली असून यामुळे जगातील सगळेच देश पुन्हा सतर्क झाले. भारताच्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्वच राज्यांना सतर्क राहण्याच्या आदेश दिलेत. महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी याबाबत आढावा घेत आरोग्य विभागाला सूचना दिल्या. सध्या तरी मास्क घालणं बंधनकारक नाही. परंतु शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असं सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीत अनके मंदिर व पर्यटनस्थळी अनेक ठिकाणी गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बैठक थोड्याच वेळात होणार असून त्यामध्ये या निर्णयाबाबत अंमलबजावणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. 


तर दुसरीकडे वणीच्या सप्तशृंगी गडावर मास्कचा वापर बंधनकारक केला असून गर्दी टाळण्याबाबत भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या कोविड-१९ संदर्भीय सुधारित विषाणूच्या संसर्गाचा संभाव्य प्रसार व संसर्ग टाळण्याच्या हेतूने आदेशीत केले असल्याने सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडद्वारे भाविकांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. आजपासून भाविकांनी केंद्र व राज्य शासनाचा प्राप्त सूचनेनुसार विश्वस्त संस्थेच्या नियमावलीनुसार मास्कचा वापर करूनच भगवती दर्शनासाठी मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर गर्दी टाळण्याच्या हेतूने सामाजिक अंतराचे पालन करावे तसेच बूस्टर डोस प्रकारातील लसीकरणाची पूर्तता करावी, असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


दरम्यान नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक महादेवाच्या दर्शन घेण्यासाठी येत असतात. ख्रिसमस आणि नव वर्षाच्या स्वागतामुळे भाविकांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेता मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान उद्यापासून म्हणजेच शनिवार 24 डिसेंबर पासून मास्क सक्ती करण्यात येईल अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच या पार्श्वभूमीवर आज त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून चीनसह जगभरावर कोरोनाचे सावट आहे. केंद्र सरकार राज्य सरकारकडने देखील आता कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केलं जात आहेत. पुन्हा एकदा मास्क घाला, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा अशा स्वरूपाचे आवाहन करायला सुरुवात झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या प्रसिद्ध सप्तशृंगी आणि त्र्यंबक मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजे. 



राज्यातील मंदिरात मास्क बंधनकारक 
ख्रिसमस आणि नवीन वर्षातल्या सलगच्या सुट्ट्यांचे नियम निमित्त साधून सध्या भाविक महाराष्ट्र मधल्या मोठ्या मंदिरांमध्ये सुद्धा गर्दी करतायेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता राज्यातल्या महत्त्वाच्या मंदिर प्रशासनाने मास संदर्भामध्ये निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. परदेशातील कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान सतर्क झाला आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टन्ससह सॅनिटायझरचा वापर करावा असा आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिरामध्ये आजपासून कर्मचाऱ्यांसाठी मास्क सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतलेला आहे. पण भाविकांना मात्र अद्याप मास्क सक्ती केलेली नाही. दुसरीकडे पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा मास्क संदर्भामध्ये निर्णय आज होणार आहे. आज मुंबईमधील मुंबादेवी मंदिरांमधील कर्मचाऱ्यांना मास घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय भाविकांनी देखील मास्कचा वापर करावा असा आवाहन करण्यात आला आहे.