Vikhe Patil : सध्या ठाकरे गटाकडून (Shivsena) ऋतुजा लटके (Rutuja Latke) आणि भाजपच्या (BJP) कमळ चिन्हावर मुरजी पटेल (Murji Patel) हे दोघे निवडणूक रिंगणात आहेत, मात्र निर्णय साफ आहे. शिवाय निवडणूक हारले तरी लटके यांचा उद्धार सरकारने कशाला करावा, त्यांचा काय उद्धार करायचा तो उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) करतील. सत्तेचा गैरवापर कोणी केला, हे मागे वळून बघा लक्षात येईल, सध्यातरी उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा घणाघात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 


मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushan Vikhe Patil) हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याचे गरज असल्याचे सांगितले. मंत्री विखे पाटील हे आज नाशिक दौऱ्यावर असून आढावा घेणार आहेत. यामध्ये जिल्हाभरात परतीच्या पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शिवाय गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लम्पि रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याबाबत आढावा घेण्यात आला. त्यानुसार अनेक ठिकाणी अजूनही शेतात पाणी असून अधिक मदत करण्याचा आपला प्रयत्न असून आज जवळपास संपूर्ण पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 


दरम्यान यावेळी त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर ताशेरे ओढेले. ते म्हणाले, ठाकरे गटाने जे राजकारण चालू आहे, त्याबाबत विचार करण्याची गरज आहे. आपण कोणत्या लोकांसोबत हातमिळवणी केली आहे. औरंगजेब च्या कबरीवर फुल वाहणाऱ्याचा सत्कार होतो, हे चुकीचं आहे. ठाकरे म्हणत आहेत कि, आम्ही सत्तेचा गैरवापर करत आहोत, मात्र सत्तेचा गैरवापर कोणी केला याचा त्यांनी आत्मपरिक्षण करावं. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. 


तसेच राज्यात वाळू माफियांचा उच्छाद मांडला असून वाळू माफियांना राजकीय आश्रय मिळाल्याचा परिणाम असल्याचे ते म्हणाले. वाळूच्या बाबतीत आंध्र, गुजरात, तेलंगणा मध्ये घेतलेले निर्णय चांगले. त्या धर्तीवर करता येईल का हे बघावं लागेल. पर्यावरण अनुपालन असल्या शिवाय यापुढे परवानगी नाही. तसेच वाळूच्या आणि खानपट्ट्याबाबत कडक अमलबजावणी होणार असल्याचेही ते म्हणाले. अवैध वाळू उत्खननासंदर्भात राज्य सरकार येत्या 21 तारखेच्या बैठकीत धोरण ठरवणार असून येत्या 21 तारखेच्या अधिकारी मंत्री यांच्यां बैठकीत निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडे गुंठे वारीच्या नावाखाली गुंड पाळण्याचे प्रकार सुरु असून कायद्याच्या चौकटीत सगळं आणावं लागेल, असेही ते म्हणाले.