Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी 14 ऑक्टोबर 1956 9 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली 4 October) आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची (Budhha Dhamma) दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला नागपूरची (Nagpur) 'दीक्षाभूमी' (Dikshabhumi) असंही म्हणतात. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. अशोक विजयादशमी किंवा 14 ऑक्टोबर रोजी अनुयायी मोठ्या संख्येनं इथं येतात. याच दीक्षाभूमीवर आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यावेळी बौद्ध धम्मातील बावीस प्रतिज्ञादेखील अनुयानांना दिल्या.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला येथे 13 ऑक्टोबर 1935 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशी घोषणा केली अन त्यानंतर तब्बल 21 वर्षानंतर नागपूर येथील दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 ला लाखो अनुयायांना बौद्ध धर्माची धम्मदीक्षा दिली. त्यामुळेच येवला मुक्तीभूमी धर्मांतराचा पाया, तर नागपूरची दीक्षाभूमी हा कळस मानला जातो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी आणि शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होतं. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. बावीस प्रतिज्ञांना 'धम्म प्रतिज्ञा', 'डॉ. आंबेडकरांच्या प्रतिज्ञा', 'बौद्ध प्रतिज्ञा', 'नवबौद्ध प्रतिज्ञा' किंवा 'नवयानी प्रतिज्ञा' असेही म्हटले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या 22 प्रतिज्ञा :
मी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
मी राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.
गौतम बुद्ध हा विष्णूचा अवतार होय, हा खोटा आणि खोडसळ प्रचार होय असे मी मानतो.
मी श्राद्धपक्ष करणार नाही; पिंडदान करणार नाही.
मी बौद्धधम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही.
मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाचे हातून करवून घेणार नाही.
सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन.
मी तथागत बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन.
तथागताने सांगितलेल्या दहा पारमिता मी पाळीन.
मी सर्व प्राणिमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
मी चोरी करणार नाही.
मी व्याभिचार करणार नाही.
मी खोटे बोलणार नाही.
मी दारू पिणार नाही.
ज्ञान (प्रज्ञा), शील, करुणा या बौद्धधम्माच्या तीन तत्त्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन.
माझ्या जुन्या, मनुष्यमात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या व मनुष्यमात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो व बौद्धधम्माचा स्वीकार करतो.
तोच सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
तसेच मी बुद्धाच्या शिकवणुकी प्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो.
दरम्यान या 22 प्रतिज्ञा मानवता व बौद्ध धम्मात महत्वाच्या मानल्या जातात. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे सार असून पंचशील, अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता अनुसरण्यासाठी आहेत. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना दीक्षा देतांना या बावीस प्रतिज्ञांचे आयोजन केलेले असल्याचे दिसून येते.