Nashik Accident : नाशिकच्या (Nashik) सिन्नर (Sinnar) परिसरात बारागाव पिंप्री- सिन्नर मार्गावर सुळेवाडी फाट्याजवळ बुधवारी दुपारच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात दोन तरुण जागीच ठार (Major Accident) झाले. ऐन दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात होऊन दोन तरुणांचा मृत्यू (Death) झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सिन्नर-निफाड रस्त्यावर बुधवारी दुपारी दीड वाजता सुमारास बारागाव पिंपरी दरम्यान सुळेवाडी फाट्यावर दोन दिवसा किंचित समारोसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यातील एक्झाम सिन्नर शहरातील तर दुसरा नांदगाव तालुक्यातील साकुर येथील होता आणि दसऱ्याच्या दिवशी घडलेल्या घटनेमुळे व्यक्त करण्यात येत आहे.
अनिकेत बबन दिघे व सोमनाथ मधुकर हिला अशी मृतांची नावे आहेत अनिकेत त्याच्या शाईन मोटरसायकल ने बीजी बारागाव पिंपरी होऊन सिन्नरला येत होता. तो आईला विंचूरला सोडून पुन्हा येत होता. तर सोमनाथ आपल्या मोटरसायकलने घोटी येथील नांदगाव कडे जात होता सिन्नर ते बारागाव पिंपरी दरम्यान सुळेवाडी फाटा जवळ या दोन्ही एकमेकांवर धडकली. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दिवसाची ओळखण्या पलीकडे झाल्या होत्या. दोघे गंभीर अवस्थेत जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटे जागेवरच पडून होते अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे दोघांची प्रकृती चिंताजनक बनली होती अखेर काही वेळानंतर सिन्नरून अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेतून दोघांना खाजगी रुग्णाल देण्यात आले मात्र तिथे पोहोचण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मोटारसायकल ओळखण्या पलीकडे...
अनिकेत हा हिरो शाईन दुचाकी तर सोमनाथ हिलम हा होंडा लिनोआ दुचाकीने जात होता. भरधाव वेगात जाताना सुळेवाडी फाट्याजवळ दोघांची समोरासमोर धडक झाली. अपघातात दोघेही रस्त्यावर पडून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती दिली. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉ्नटरांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी एमआरयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून शिपाई विलास जाधव पुढील तपास करीत आहेत.
नाशिक ग्रामीणचे अपघात कधी थांबणार?
एकीकडे नाशिक ग्रामीणचे रस्त्यांची चाळण झाली असून अशातच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. नाशिकच्या गंगापूर गिरणारे रोड हा अपघातांना आमंत्रण देणारा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक सचिन पाटील या नाशिक ग्रामीणच्या रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट ची पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. तसेच राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण चर्चा करून अपघातांना आळा बसविण्यासाठी उपाययोजना अंमलात आणल्या जाणार होत्या. मात्र फक्त ब्लॅक स्पॉटची पाहणी कागदावरच राहते की काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.