Nashik Crime : सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याच्या घटना अनेक घडले आहेत. मात्र नाशिकमध्ये (Nashik) पंचवटी जवळील आडगाव शिवारात चक्क पत्नी तिचा मित्र व सासूबाईंच्या छळाला कंटाळून पतीनेच विषारी औषध (Poison) सेवन करत जीवनप्रवास संपवल्याची धक्कादायक घटना समोर झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Adgaon Police) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असून योगेश चंद्रकांत नागरे असे मयत युवकाचे नाव आहे.
पत्नी व तिच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या जाताला कंटाळून पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नागरे हे एका खाजगी धान्य कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरीला होते. आडगाव परिसरातील एका हॉटेलात काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना समोर झाली होती. औषध सेवन केल्यानंतर मयत योगेशने त्याच्या भावाला विषारी औषध सेवन केले आहे, असे सांगितले. भावाने लागलीच घटनास्थळी पोहचून योगेशला एका खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे त्याने तीन महिन्यांपूर्वीच पूजा तिलक कुमार छेत्री हिच्यासोबत प्रेम विवाह केला होता. पूजाच्या मैत्रिणीसह सासू कडून वारंवार होणाऱ्या छळाला आणि मारहाणीला कंटाळून योगेश याने आत्महत्या केल्याची फिर्याद त्याच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. सुनिता चंद्रकांत नागरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा मुलगा योगेश याची पत्नी पूजा, सासू सविता छेत्री व पूजाचा मित्र दीप व दीपची पत्नी अशा चौघांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध मानसिक छळ करून आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
तीन महिन्यापूर्वी प्रेमविवाह
काही दिवसांपूर्वी माहिती योगेश हा पुणे ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तेथे त्यांनी खाजगी क्लास देखील लावला होता. या ठिकाणी त्याची पूजा छेत्री या महिलेसोबत ओळख झाली. त्यातून त्या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह केला होता. दोघेही नाशिकच्या इंदिरा नगर पोलिसांच्या हद्दीत पाथर्डी परिसरात राहत होते. तर योगेश हा सातपूर येथे एका खाजगी धान्य कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरीला होता. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांनीच पत्नी व सासूने वारंवार पैशांसाठी योगेशकडे तगादा लावला. त्यानंतर मित्र आणि त्याच्या पत्नीला बोलावून वेळोवेळी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या सर्वांच्या छळाला कंटाळून योगेशने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.