Nashik Crime : चांदवड (Chandwad) तालुक्यातील कातरवाडी येथे दोन दिवसापूर्वी सोपान बाबुराव झाल्टे यांचा राहत्या घरी अज्ञात लोकांनी हल्ला करून खून (Murder) केला होता. या प्रकरणी सोपान यांच्या बायकोने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांच्या तपासात वेगळेच सत्य समोर आले आहे. झाल्टे यांच्या बायकोचाच खुनात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले असून अन्य दोघांना चांदवड पोलिसांनी (Chandwad Police) ताब्यात घेतले आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील सोपान बाबूराव झाल्टे त्यांच्या राहत्या घरात पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. त्या वेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्यावर लाकडी दांड्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील बाबूराव महादू झाल्टे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान मालेगाव ग्रामीण पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व नाशिक ग्रामीण सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनात तपास सुरु असताना मयत सोपान बाबुराव झाल्टे यांची खुनाच्या आरोपात पत्नी मनीषा सोपान झाल्टे तिचे सहकारी सुभाष संसारे, खलील शहा असे तीन संशयिताना पोलिसांनी अटक केली असून सदर संशयित चांदवड पोलीस स्टेशन ताब्यात आहे. 


दोन दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील शेतकरी बाबुराव महादू झाल्टे हे आजारी असल्याने घरातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. त्यांच्या देखभालीसाठी त्यांचा मुलगा सोपान बाबुराव झाल्टे हेही त्यांच्यासमवेत पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणावरून पती व सासरे यांना लाकडी दांडकने मारहाण केली. त्यात पती सोपान झाल्टे हे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. सासरे बाबुराव झाल्टे हे गंभीर जखमी झाले. आरडाओरड झाल्याने पत्नी धावून आली मात्र संशयित पसार झाले होते. यानंतर घटनेची तक्रारी सोपं यांची पत्नी मनीषा झाल्टे यांनी केली. दरम्यान सोपान झाल्टे यांच्या पत्नीच्या तक्ररीनुसार तपास सुरु असताना तपासाची सर्व बाजू त्यांच्या पत्नीकडे जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी उलटा तपास करण्यास सुरवात केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत. 


पतीच्या खुनात पत्नीचा सहभाग 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा यांचे सासरे बाबुराव महादू झाल्टे हे आजारी असल्याने त्यांच्या कातरवाडी शिवारातील घरातील पत्र्याच्या शेडमध्ये झोपले होते. त्यांच्या देखभालीसाठी पती सोपान बाबुराव झाल्टे हेही त्यांच्यासमवेत पत्र्याच्या शेडमध्ये झोपलेले असताना रात्री 11 वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने अज्ञात कारणावरून पती व सासरे यांना लाकडी दांडकने मारहाण केली. त्यात पती सोपान झाल्टे हे रक्ताच्या थारोळ्यात पडून त्यांचा मृत्यू झाला. सासरे बाबुराव झाल्टे हे गंभीर जखमी झाले. जखमी बाबुराव झाल्टे यांच्यावर मनमाड येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले.