Nashik Bribe : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात लाच घेणाऱ्या कमर्चाऱ्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच नाशिक शहर (Nashik City Police) पोलिसांच्या दलातही लाच घेण्याचे प्रमाण वाढले आहे. तर नाशिक ग्रामीण पोलिसांमध्ये आणखी एक लाचेचे (Bribe) प्रकरणे समोर आले आहे. 20 हजारांची लाच मागणाऱ्या एका पोलीस निरीक्षकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. 


नाशिक ग्रामीण हद्दीतील मालेगाव पोलीस ठाणे (Malegaon Police Station) हद्दीत लाचेची घटना घडली आहे.  नशेच्या पदार्थांशी संबंधित असलेल्या व्यक्तीसह त्याच्या मित्रावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे आरोपावरून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार ताराचंद घुसर, पोलीस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील आणि सय्यद रशीद सय्यद रफिक उर्फ रशीद बाटा यांना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


दरम्यान पोलीस खात्यातील लाचखोरी थांबण्यास तयार नाही. मालेगाव येथे एक पोलीस निरीक्षकासह पोलीस कर्मचारी आणि एका खासगी व्यक्तीला वीस हजारांची लाच मागीतल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी  पकडले. तक्रारदाराचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र दि. 3 सप्टेबरला जेवण करुन घरी परतत असताना ते एमडी या नशेच्या पदार्थांशी संबधित आहेत. या कारणावरुन त्यांना मालेगाव शहर पोलीस ठाण्यात चौकशीला नेण्यात आले होते. कायदेशीर कारवार्ई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदार यांचा भाऊ व त्यांच्या मित्रासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आली. तडजोडअंती वीस हजार रुपये निश्‍चित करण्यात आले. 


त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर पथकाने सापळा रचला असता मालेगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशचंद ताराचंद घुसर, पोलीस नाईक आत्माराम पाटील, खासगी व्यक्ती सय्यद राशीद सय्यद रफिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात पोलीस निरीक्षक संदीप घुगे, गायत्री जाधव, हवालदार एकनाथ बाविस्कर, मनोज पाटील, संजय ठाकरे,  नितीन नेटारे, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने कारवाई केली. 


संपर्क साधण्याचे आवाहन 
एकीकडे गृह विभाग 'खाकीची प्रतिमा' सुधारण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे शहर पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी खाकीला काळिमा फासणारी कृत्ये करत असल्याची बाब उघड झाली आहे. गेल्या वर्षभरात लाच लुचपत विभागाने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.