Nashik News : मनमाड (Manmad) शहरातील नगरपरिषदेतील तीन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता तहसील विभागात (trimbakeshwer Tahsil) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने लाच घेतल्याची घटना समोर आली आहे. त्र्यंबकेश्वर येथील तहसील कार्यालयात नेमणूक असलेला शासकीय वाहन चालक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे.
नाशिकसह (Nashik) विभागात लाचखोरीच्या (Bribe) घटनांना ऊत आला आहे. बहुतांश घटनांत सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराची कीड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे चित्र आहे. हे सातत्याने लाचखोरीच्या घटनांनी अधोरेखित होत आहे. नाशिकमध्ये तर टक्केवारीला उधाण आले आहे. दर एक दिवसाआड लाचखोरीचं एक प्रकरण समोर येत आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील तहसील कार्यालयात नेमणूक असलेले शासकीय वाहन चालक अनिल बाबुराव आगीवले हे दीड लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडले आहेत.
तक्रारदार मौजे इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील शिरसाट येथील असून शिरसाटे गावातील गट नंबर 176 मधील शेत जमीन विकत घेण्याकरता विसर पावती नोटरी केली होती सदर शेत जमिनीच्या संदर्भात तत्कालीन उपवियोग विभागीय अधिकारी इगतपुरी त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे वाद चालू होता. सदर वादाचा निकाल तक्रार यांच्या बाजूने करून दिल्याच्या मोबदल्यात आगिवले यांनी 24 फेब्रुवारी दोन लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी 50 हजार यापूर्वी दिले होते. दरम्यान उर्वरित एक लाख पन्नास हजार रुपये लाचेची रक्कम मागेवाले यांनी पुन्हा तक्रारदाराकडे मागितली यावेळी तक्रारदाराने थेट एसीबीकडे धाव केले घडलेला प्रकार सांगितला एसीबीने नेहमीप्रमाणे सापारचत संबंधित शासकीय कर्मचाऱ्यास दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
सरकारी कार्यालये जणू लाचखोरीची केंद्रे
नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात अनेक भागातील सरकारी कार्यालये जणू लाचखोरीची केंद्रे बनत चालली आहेत. दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रकरण समोर येत असल्याने प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मागील आठवड्याची आकडेवारी बघता दररोज एक लाचखोरीचे प्रकरण समोर येत आहे. त्यामुळे एसीबी पथकाने सरकारी कार्यलयातील लाचखोरांना चांगलाच दणका दिला आहे. मात्र दुसरीकडे लाचखोरांना एसीबी विभाग पकडत असतानाही वारंवार घटना समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणात लाच घेताना रंगेहाथ पकडलेला वाहनचालकाने ही लाच नेमकी कोणत्या अधिकाऱ्यांसाठी घेतली. याबाबत चर्चेला उधाण आले आहे.