Nashik News : मालेगाव (Malegoan) शहरालगतच्या दरेगाव शिवारातील हिल स्टेशन परिसरातील तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी (Drowning) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. 


नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले ओसंडून वाहत आहेत. तसरच धरणे तलाव जलाशय हे देखील फुल्ल भरले आहेत. अशातच पर्यटनाला देखील बहर आला आहे. त्यामुळे बाहेर फिरायला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्र्यंबकेश्वर (trimbakeshwer) शहराजवळील दुगारवाडीची घटना ताजी असतानाच आता मालेगाव शहराजवळील धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 


मालेगाव शहरालगतच्या दरेगाव शिवारातील हिल स्टेशन परिसरातील तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. नुमान अख्तर, शाकीर अहमद साजिद अहमद व महफूज रहमान अहमद अशी तिघा अल्पवयीन मुलांची नावे आहेत. हे तिघे मित्र मालेगाव शहरातील पवारवाडी भागातील राहणारे आहेत. काल दुपारच्या सुमारास हे तिघे मित्र मालेगाव शहराजवळील दरेगाव शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने तलावातील 35 ते 40 फूट पाण्यात त्यांचाबुडून मृत्यू झाला. 


दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तात्काळ मालेगाव शहरातील शकील व किल्ला तैराखी या टीमला पाचारण करण्यात आले. यांनी काही वेळातच या तिघांचा मृतदेह बाहेर काढला. घटनेननंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शिवाय धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


पर्यटकांनी काळजी घेणे आवश्यक 
पावसाळ्यात अशा घटना प्रकर्षाने समोर येतात. अनेकदा संबंधित तलावाच्या, धरणाच्या ठिकाणी धोक्याचे सूचना फलक लावण्यात आलेले असताना देखील अनेक उत्साही पर्यटक जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरतात. अशावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने अशा विपरीत घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी न जाता, पर्यटनस्थळी गेल्यावर स्वतःसह इतरांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे या घटनांवरून दिसून येते. 


दुगारवाडी येथील घटना 
नाशकातील त्रंबकेश्वरमधील दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी अनेक पर्यटक गर्दी करत असतात. काही दिवसांपूर्वी हा धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना मात्र आयुष्यभराचा धडा मिळाला आहे. नाशिकहून धबधब्याचं आनंद अघेण्यासाठी आलेला एक ग्रुप धबधब्यात अडकून पडला. वेळीच रेस्क्यू टीम पोहचल्यानंतर २२ जणांची सुटका करण्यात आली होती. मात्र एकजण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांनी वेळीच धोका ओळखून स्वतःसह इतरांची काळजी घेणे आवश्यक आहे.